‘राधाकृष्ण विखे पाटलांवर धाडी टाकण्याची हिंमत आहे का?’ झाकीर नाईकच्या वादात ठाकरेंची उडी

‘राधाकृष्ण विखे पाटलांवर धाडी टाकण्याची हिंमत आहे का?’ झाकीर नाईकच्या वादात ठाकरेंची उडी

Uddhav Thackeray vs Radhakrishna Vikhe : लोकनियुक्त प्रतिनिधींचे घोटाळे रोज बाहेर येत आहेत. रोजच मंत्र्यांचे घोटाळे समोर येत आहेत. कुलचा घोटाळा काढला सगळं ढिम्म. विक्रांतचा घोटाळा आला त्याला क्लीन चिट. आणखी कुणाचा घोटाळा आला त्यालाही क्लीन चिट. आता तर राधाकृष्ण विखे पाटलांचा. ज्या कायद्याखाली नवाब मलिकांना आत टाकलं त्याच कायद्याखाली राधाकृष्ण विखेंवर (Radhakrishna Vikhe) कारवाई होणार का कारण त्यांच्या संस्थेने झाकीर नाईककडून पैसे घेतल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. भाजपवाल्यांमध्ये आहे हिंमत त्यांच्यावर धाडी टाकण्याची ?, असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विचारला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक आज मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, काश्मिरमध्ये ते काय करत आहेत. काश्मीर एक प्रयोगशाळा करत आहेत. काश्मिरमधील नेत्यांना घरात कोंडून ठेवले होते. देशात बाकीच्यांना पण करू शकतात.

‘मी मुद्दाम मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो, भाजपला मिरच्या का झोंबल्या?’ ठाकरेंचा जळजळीत सवाल

आज मुंबई महापालिकेत ज्या काही धाडी टाकलेल्या आहेत. अधिकाऱ्यांवर धाडी टाकताहेत. टाका सगळ्या अधिकाऱ्यांवर धाडी टाका. पण जर लोकनियुक्त प्रतिनिधी असताना भ्रष्टाचार होत असेल नंतर जो काही घोटाळा झाला आहे. रोज मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येत आहेत. कुलचा घोटाळा ढिम्मं सगळं. विक्रांतचा घोटाळा काढला क्लिन चीट आणखी कोणाचा घोटाळा काढला क्लीन चिट. आता राधाकृष्ण विखे पाटलांचा. ज्या एका कलमाखाली नवाब मलिकांना आत टाकलं त्याच कायद्याखाली राधाकृष्ण विखे पाटलांवर कारवाई होणार आहे की नाही? कारण, त्यांनी जाहीर केलं आहे की होय त्यांच्या संस्थेने घेतलेत झाकीर नाईककडून पैसे. झाकीर नाईक हा देशद्रोही म्हणून तिकडे नमूद केला गेला आहे. मग देशद्रोह्याकडून तुम्ही पैसे घेतलेत? चार कोटी नाही अडीच कोटी घेतले पण झाकीर नाईककडून घेतले तुम्ही. आहे भाजपवाल्यांमध्ये हिंमत राधाकृष्ण विखेंवर धाडी टाकण्याची? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

जुने नेते उपऱ्यांची भांडी घासतात

इकडची तिकडची सगळी सोंगं गोळा करून तुम्ही पक्ष चालवताय. सगळ्यात मोठा पक्ष. पण कधी काळी ज्या जुन्या जाणत्यांनी कष्ट करून कधीतरी भाजप सत्तेत येईल अशी अपेक्षा केली होती ते आज सगळे या उपऱ्यांची भांडी घासत आहेत.

“देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे, लक्षात ठेवा…” ठाकरेंचा फडणवीसांना गर्भित इशारा

मणिपूरमध्ये जा तिकडेही हिंदूच मरत आहेत

चौकशी करायचीच असेल तर संपूर्ण पीएम केअर फंडाची करा. म्हणजे आपल्या देशाची प्रतिमा वाढेल. अरे मणिपूरमध्ये जा मणिपूरमध्ये काय हिंदू मरत नाहीत. काल ममता बॅनर्जी सांगत होत्या त्यांच्याकडे ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. तिकडे केंद्रीय सुरक्षा दल वापरले जात आहे. स्टॅलिन म्हणाले आमच्याकडे घुसत आहेत. जास्त नादी लागाल तर ठोकून काढू असा इशारा त्यांना दिल्याचे स्टॅलिन म्हणाले. असा आता सगळा देश उभा राहिला आहे.

फडणवीस तिकडे उत्तर प्रदेशात जाऊन बोंबला

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये 70 मुले ऑक्सिजनशिवाय अशीच गेली होती. त्यावेळी तर कोरोना सुद्धा नव्हता. काय तिकडे जाऊन बोंबला ना फडणवीसजी. काय हिंदू मुले नव्हती का त्याच्यात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube