Rally of accused Pune Police too punish by rally : पुणे पोलिसांकडून काढल्या जाणाऱ्या गुंड आणि गुन्हेगारांच्या धिंड अनेकदा चर्चेचा विषय ठरत असतात. त्यात आता पुणे पोलिसांनी अशाच काही दहशद माजवणाऱ्यांची धिंड काढली आहे. येरवडा पोलीस स्टेशन अंतर्गत जेलमध्ये सुटून आलेल्या आरोपीची रॅली काढणाऱ्यांना पुणे पोलिसांनी धडा शिकवला आहे.
नेमकं प्रकरण काय?
येरवडा पोलीस स्टेशन अंतर्गत जेलमध्ये सुटून आलेल्या आरोपीची काही इतर आरोपींकडून रॅली काढण्यात आली होती. त्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला होता. तसेच दहशतीच वातावरण निर्माण झालं होतं. त्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या आरोपींना चांगलाच धडा शिकवला आहे.
सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्या…संसदेत आंदोलन, निलेश लंकेंसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक
त्या विरोधात पोलिसांनी रॅली काढलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर जेथे या आरोपींनी जेलमधून सुटलेल्या आरोपीची रॅली काढली होती. तेथेच त्यांची पोलिसांनी धिंड काढली आहे. या प्रकरणात तीन आरोपी फरार झाले होते. त्यांना देखील अटक करून जिथे दहशद माजवली होती तिथूनच त्यांची धिंड काढण्यात आली आहे.
जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, माझ्या घरावर रेकी; लक्ष्मण हाकेंचे गंभीर आरोप
यामध्ये 1) प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे, 26 वर्षे, राहणार – भीम ज्योत मंडळ, येरवडा, 2) प्रथमेश संजय राठोड, 21 वर्षे, राहणार – कामराज नगर, येरवडा 3) बाबा भानुदास गवळी, 30 वर्षे, राहणार – भीम ज्योत मंडळ, येरवडा यांच्यासह घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली. तसेच गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या इतर पाहिजे आरोपीचा शोध व गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या वाहनांचा शोध त्यांच्यामार्फतीने घेण्यात आला.