“हा पाहुणा आपल्याकडे आला आहे, तो किती दिवस सांभाळायचा एवढाच विषय आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोल्हापूरला पाठवायचं का हा पुणेकरांचा विषय आहे.” अशी खोचक टीका कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
कसबा पोटनिवडणुकीच्या वेळी चंद्रकांत पाटील विरुद्ध रवींद्र धंगेकर असा वाद रंगला होता. त्यावेळी पाटील यांनी केलेलं “हू इज धंगेकर” अशी खोचक टीका धांगेकर यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्यावर निवडून आल्यावर देखील धंगेकर यांनी त्यांना उत्तर दिले होते.
Letsupp Special : Ajit Pawar यांचा स्पष्टवक्तेपणा अशा वेळी कोठे जातो?
आज चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, पाटलांच्या बोलण्यात हुकुमशाहीची वाटचाल दिसते. त्यांनी कोण धंगेकर यासारखी अनेक विधानं केली आहेत.” ते पुढे म्हणाले की, परवा बाबरी मशिदीवरून शिवसैनिकांवर घसरले. ते आता काहीही बोलू शकतात. आमच्या हातात सत्ता आहे आणि कुणालाही उद्ध्वस्त करू शकतो, अशी त्यांची बेताल वक्तव्ये आहेत.
त्यामुळे हा पाहुणा आपल्याकडे आला आहे, तो किती दिवस सांभाळायचा एवढाच विषय आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोल्हापूरला पाठवायचं का हा पुणेकरांचा विषय आहे. असा खोचक टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
Shital Mhatre : ‘दोघेही, एक ही थाली के चट्टे-बट्टे…’ म्हात्रेंचा राहुल गांधी आदित्य ठाकरेंवर निशाणा