Teacher Recruitment : राज्यात गेल्या वीस वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीचा (Teacher Recruitment) पहिला टप्पा रविवारी रात्री पूर्ण करण्यात आला आहे. जवळपास 11 हजार नवीन शिक्षकांची भर राज्यातील शाळांमध्ये पडल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांनी दिली आहे.
सूरज मांढरे यांनी सांगितले की भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही प्रभावाखाली न येता प्रक्रिया पूर्ण केली आहे. संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना कोणाच्या काही शंका असल्याचे त्याचेही निरासन करण्यात आले आहे. यासाठी पहिल्यांदाच ‘तक्रार निवारण व दुरुस्ती समितीची’ रचना करण्यात आली होती. ही सुविधा इमेल द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, असे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करण्यास कोणासही संधी मिळू नये यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांचे फोन रेकॉर्ड करावेत, फोटो ठेवावेत व अशांविरुद्ध थेट पोलीस तक्रार करावी असे खुले आवाहन केले होते. अभियोग्यताधारकांना संभ्रमित करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या गेल्या असे सूरज मांढरे यांनी सांगितले.
Sonu Sood Post: शाळा आणि शिक्षणाच्या उभारणीसाठी सोनू सुदचे नवे पाऊल, म्हणाला….
या प्रक्रियेदरम्यान जेव्हा जेव्हा काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या त्याचे मंत्रालय स्तरावरून शिक्षण मंत्री व प्रधान सचिव यांनी अत्यंत तातडीने व प्रगल्भतेने निराकरण केल्यामुळे प्रक्रिया पुढे नेणे सुकर झाले. या सर्वांचा परिणाम म्हणून निवड न झालेल्या उमेदवारांमध्ये देखील भरती प्रक्रिया अत्यंत निष्पक्ष पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पूर्ण झाल्याची भावना आहे, असे मांढरे यांनी सांगितले.
एकंदरीत इतक्या उचित पद्धतीने निवड झालेले सर्व नवीन शिक्षक, विद्यार्थी घडवण्याच्या कामात त्यांचे पूर्ण योगदान देतील अशी अपेक्षा मांढरे यांनी व्यक्त केली.