अजितदादा इंजिनियरपेक्षाही हुशार; 10 वी पास म्हणून हिणवणाऱ्या दामानियांना चाकणकरांची चपराक

अर्थमंत्री अजित पवारांना काहीच कळत नाही. महाराष्ट्र कर्जात बुजाला आहे. राज्यावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे.

  • Written By: Published:
Ajjitpawwar

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. दमानिया म्हणाल्या, आपले सध्याचे अर्थमंत्री दहावी पास असून त्यांना काहीच कळत नाही. दमानिया यांच्या या टीकेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दमानियांचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे.

आदरणीय अजितदादा पवार यांच्या वडिलांचं हृदय विकाराने दुःखद निधन झालं. त्यावेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते. वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडलं.त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे.

शेतकऱ्यांचे इन्सेंटिव्ह वाढवणार! अजित पवारांची मोठी घोषणा; साखर उद्योगावर महत्त्वाचा निर्णय

‘शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरूवात केली, पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिके घेतली. मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला.गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत.’, असं देखील त्यांनी सांगितलं.

‘त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टीकोनामुळेच.’, असंही चाकणकर म्हणाल्या आहेत.

अजित पवारांना काहीच कळत नाही. महाराष्ट्र कर्जात बुजाला आहे. राज्यावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे. अर्थमंत्री दहावी पास असून त्यांना काहीच कळत नाही. असेट काय आहेत लायबिलिटीज काय आहेत, एवढे नऊ लाख कोटी आपण आणार कुठे आहोत?, असे अंजली दमानिया यांनी म्हटले होते.

follow us