Download App

प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर! पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया

Rohini Khadse Shared Social Media Post Husband Arrest : पुण्यात (Pune News) अलीकडेच उघडकीस आलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर यांचं नाव समोर आले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर करत आपली (Rave Party Pune) भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

तिसरी ते दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमातून तिसरी भाषा हद्दपार! एससीईआरटीकडून सुधारीत अभ्यासक्रम जाहीर

रोहिणी खडसे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्या आपल्या पती प्रांजल खेवलकर यांच्यासोबत एका मंदिराबाहेर उभ्या असल्याचं दिसतंय. या फोटोसह त्यांनी एक कॅप्शन लिहिलं आहे, कायद्यावर अन् पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. या वाक्यातून त्यांनी सध्याच्या चर्चांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

Rashi Bhavishya : मेष, कन्या आणि धनु राशींसाठी भाग्यशाली इतरांचं काय? जाणून घ्या सविस्तर…

रेव्ह पार्टी आणि प्रांजल खेवलकर

पुण्यात झालेल्या एका गुप्त रेव्ह पार्टीचं आयोजन प्रांजल खेवलकर यांनीच केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही हॉटेल बुकिंगच्या पावत्यांवर त्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. विशेष म्हणजे, या पार्टीतील दोन रूम्स खेवलकर यांच्या नावावर बुक करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा थेट सहभाग होता का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. प्रांजल खेवलकर हे व्यवसायाने उद्योजक असून, त्यांचं पुण्यात वारंवार येणं-जाणं होतं. त्यांच्या व्यवसायाचं केंद्रबिंदूही पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा

या प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी थेट प्रतिक्रिया न देता संयम पाळल्याचं दिसून येतं. मात्र, त्यांनी सत्य स्वतःहून उघड होईल, असं नमूद करून आगामी काळात काही नवे खुलासे होण्याची शक्यता असल्याचं संकेत दिले आहेत. रोहिणी खडसे यांचं मतदारसंघ, पक्षातील स्थान आणि एकूणच राजकीय प्रवास लक्षात घेता, हे प्रकरण संवेदनशील ठरू शकतं.

follow us