रविवारी आलात….आतापर्यंत तुम्ही फक्त गोट्या खेळल्यात का ? रोहित पवारांचे उद्योगमंत्री सामंतांना प्रत्युत्तर

Rohit Pawar: उदय सामंत हे राज्याचे गेल्या पाच-सहा वर्षांपासून उद्योगमंत्री आहे. या पाच-सहा वर्षांमध्ये उद्योगासाठी, व्यावसायिकांसाठी काय केले आहे.

Rohit Pawar

Rohit Pawar

Rohit Pawar On Uday Samant : पुण्यातील चाकण एमआयडीसीमधील रस्ते आणि खड्ड्यांमुळे उद्योजकांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत ( Uday Samant) चाकणला आले. त्यांनी रस्त्याची पाहणी करून तातडीने रस्ते दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली. या एमआयडीडीस राजकारण आणण्याचा प्रयत्न काही जणांनी केल्याची टीका सावंत यांनी केली. त्याला आता आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उदय सामंत हे राज्याचे गेल्या पाच-सहा वर्षांपासून उद्योगमंत्री आहे. या पाच-सहा वर्षांमध्ये उद्योगासाठी, व्यावसायिकांसाठी काय केले आहे. राजकीय उद्योगात ते जास्त बिझी असतात. एमआयडीसीच्या प्रगतीसाठी काय केले पाहिजे, खरे काय तेथे सांगितले पाहिजे होते. नौटंगीबद्दल बोलले आहे, खरे तर आम्ही तिथे जावून लोकांच्या अडचणी समजून घेतले आहे. पुढे आणल्या होत्या. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी वेगळे काय केले आहे. महाराष्ट्रात किती कंपन्यांना आणल्या आहेत. चाकण एमआयडीसी अडचणीत आहेत. व्यावसायिकांनी प्रेस घेतल्यानंतर सगळीकडे गडबड निर्माण झाली. मग रविवारी तिथे गेला. आतापर्यंत तुम्ही फक्त गोट्या खेळल्या आहेत का ? असा प्रश्न निर्माण होतो, असा सवाल रोहित पवारांना केला आहे.

प्रेसमधील मुद्दे आमच्याकडे आल्यामुळे आम्ही तिकडे गेले होतो. दहा महिन्यापूर्वी चर्चा होऊन तुम्ही आश्वासन दिले आहे. तुमची आश्वासन जवळून बघितले आहे. त्यांनी काहीच केलेले नाही हे अनुभवले आहे अनेकवेळा, अशी टीका रोहित पवारांनी केलीय.


चाकणमधील प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उच्चस्तरीय समिती-सामंत

चाकणमधील प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, उद्योगांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्षही सुरू करण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version