Rohit Pawar On VSR : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. विमान अपघातप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी केलीय. अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. याचा तपास सीआयडी करत आहे. रोहित पवार यांनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्याकडील माहिती दिली आहे. सीआयडीची पत्रकार परिषद झाल्यानंतर रोहित पवार यांची पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत.
रोहित पवार म्हणाले, अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा रिपोर्ट बनवावा लागतो. त्यावरून तपास सुरू केला जातो. अजितदादांच्या अपघाती मृत्यूप्रकरणाला डीजीसीए आणि विमान पुरविणाऱ्या व्हीएसआर कंपनीला जबाबदार धरून गुन्हा दाखल केला पाहिजे. पोलिस यंत्रणा आम्हाला मदत करत नव्हते म्हणून मी सीआयडीकडे आलो होतो. तब्बल 27 दिवसानंतर सीआयडीने पत्रकार परिषद घेतली. आम्ही माहिती घेतोय आणि माहिती गोळा करतोय असे अधिकारी सांगत आहे. मला न विचारता सीआयडीने माझे स्टेटमेंट रेकॉर्ड केलंय. माझा डाऊट डीजीसीएवर आहे. तपास चुकीच्या पद्धतीने होऊ शकते असा आमच मत आहे. सीबीआयकडे तपास जाईल तेव्हा सीआयडीच्या चांगल्या अधिकाऱ्यांकडे तपास राहणार नाही. एआयबीबी रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो मग तसे झाले तर हा घात होता की अपघात यात कळणार नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीला कोणीतरी वाचवत आहे, ती खूप मोठी व्यक्ती आहे, त्यावर प्रेशर आहे का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय.
जगावर 2008 सारखे आर्थिक संकट घोंगावतय ? सर्वात मोठ्या वित्तीय संस्थेचे भाकित
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बॉस आहेत. त्यांना निर्णय घेतला पाहिजे. पण त्यांना प्रेशर कोणाचा आहे हे कळत नाही. गुन्हा न दाखल न केल्यास आम्ही कोर्टात जावून गुन्हा दाखल करायला लावू. मुख्यमंत्री कार्यालयात फोन आला होता. अजित पवार यांच्या स्मारकाबाबत बैठक उद्या होत आहे. त्यावेळेस मी गुन्हा का दाखल केला नाही, असा प्रश्न उपस्थित करणार आहे. पोटनिवडणुकीत मी सगळ्या पक्षांना विनंती करतो की सुनेत्राकाकी बिनविरोध विधानसभा आमदार झाल्या पाहिजेत, असे रोहित पवार म्हणाले.
अजित पवार अपघात प्रकरणात CID ची एंट्री; DGCA ची VSR वर कारवाई; CID तपासात नवे पुरावे समोर
सुनील तटकरे यांच्यावर पुन्हा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. त्यांच्याबद्दल दादा काय बोलले होते हे मला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकाउंटवर कोणाच्या घरचे बिल देण्यात आली, कुणाची ब्युटी पार्लरची बिले देण्यात आली. हेलिकॉप्टरमध्ये कुठल्या नेत्याला फेशिअल करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बँक अकाऊंट गैरव्यवहार झाला. त्यामुळे अजितदादा चिडलेले असायचे हे काय मी वेगळं सांगायला नको, असे रोहित पवार म्हणाले.
अनुभवी मार्गदर्शकांनी प्रेशर आणल्याने शपथविधी
सुनेत्राकाकी यांची कुठेही इच्छा नव्हती उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी चौथ्या दिवशी झाला पाहिजे.अनुभवी मार्गदर्शक होते त्यांनी प्रेशर आणून चौथ्या दिवशी त्यांचा शपथविधी करण्यात आला असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय.
