Download App

राऊतांवरील टीकेला रुपाली ठोंबरेंचे प्रत्त्युत्तर, नितेश राणेंना दिली ‘नाच्या’ची उपमा

Rupali Thombre on Nitesh Rane : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील आरोपांना भाजप आमदार नितेश राणे प्रत्त्युत्तर देत आहेत. त्यामुळे राऊत विरुद्ध राणे असा सामना महाराष्ट्रातील लोकांना बघायला मिळतो आहे. संजय राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना नितेश राणे यांनी संजय राऊत यांना ‘गौतमी पाटील’ची उपमा दिली होती. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी नितेश राणेंवर जोरदार टीका केली आहे. आम्ही नितेश राणेला ‘नाच्या’ म्हटले तर चालेल का? असा सवाल केला आहे.

रुपाली ठोंबरे म्हणाल्या की गेल्या दिवसांत भाजप आणि शिंदे गटाने राजकारणाची पातळी अत्यंत हीन केली आहे. दर्जाच ठेवला नाही. काहीही बोलायचे, कामाच्या कोणत्या गोष्टी बोलायच्या नाहीत, विरोधकांवर सूडबुद्धी, घाणेरड्या भाषेत बोलणं आणि आता तर नितेश राणेंनी मोठा कहर केलाय. गौतमी पाटीलचा स्व:ताच्या पोटासाठी व्यवसाय करत आहे. तिला हिनवण्याचा अधिकार नितेश राणेंना कोणी दिला? सरकारमधील लोकांनी महिलांच रक्षण केलं पाहिजे, त्यांना सक्षम केलं पाहिजे पण त्याच्या उलट महिलांना हिनवण्यासाठी अशाप्रकारचे शब्द वापरत आहेत. आता नितेश राणेंना भाजप-शिंदे गटाचा ‘नाच्या’ म्हटले तर चाललं का? तुमची जर जीभ घसरत असेल तर तुम्हाला देखील त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी नितेश राणे यांच्यावर केली आहे.

राहुल नार्वेकर करणार तरी काय? झिरवळांनी दिलं खोचक उत्तर

त्या पुढं म्हणाला की राजकारणाची पातळी सांभाळली पाहिजे. संजय राऊत यांनी हिनवण्याच्या उद्देशाने कोणता शब्द वापरला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने ते रोज सकाळी प्रेस घेऊन भूमिका मांडत असतात. आता त्यांना उत्तर द्यायचे म्हणून नितेश राणे असे बोलत असतील तर याचा काही अर्थ नाही. त्यांच राज्यात आणि केंद्रात सरकार आहे. त्यांनी कामाच्या गोष्टी कराव्यात. यापूर्वी भाजपने राजकारणाचा स्तर खाली आणला आहे. त्यांना जशास तसे उत्तर संजय राऊत देत आहेत, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली.

संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर सोडणार? लोकसभेसाठी राज्यातील 4 मतदारसंघांचा विचार सुरु

भाजप आणि शिंदे गटाकडून महाराष्ट्रातील महिलांना धोका आहे. महिलांच्या आत्महत्येच राजकारण भाजपने केलं. त्यातून विरोधाकांना बदनाम केलं. खोटे गुन्हे दाखल केले आहेत. तानाजी सावंत, संजय सिरसाट, गुलाबराव पाटील यांनी महिलांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर बोलले आहेत. तानाजी सावंतांच्या रणरागिणींना सुषमा अंधारे तशाच तसे उत्तर देतील. तानाजी सावंत हे स्वत: आरोग्यमंत्री असल्याचे विसरलेत वाटतं? आपल्याला ही भाषा शोभत नाही. आरोग्याची भाषा त्यांना कळत नसेल तर कायदा सुव्यवस्था काय कळणार आहे, अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी तानाजी सावंत यांच्यावर केली आहे.

Tags

follow us