Download App

ललित पाटीलला पळवून लावण्यात डॉक्टरचा हात असेल असं….; ससूनच्या डीननं स्पष्टचं सांगितलं…

  • Written By: Last Updated:

Sanjeev Thakur : ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil) हा ससूनमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, मी ससूनमधून पळालो नाही, तर मला पळवण्यात आलं होतं, असं विधान ललितने प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर केलं होतं. दरम्यान, आता काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे ससून हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप करत आहे. ललित पाटील हा ससूनमधून फरार होण्यात संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर आता संजीव ठाकूर यांनी भाष्य केलं.

सख्खे मित्र बनले पक्के विरोधक! माजी IAS-IPS अधिकारी दोस्तांनी एकमेकांच्या विरोधात ठोकला शड्डू 

ललित पाटील यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी एक मंत्री ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना फोन करत होते. या मंत्र्याचे गुन्हेगारी जगतात चांगले संबंध आहेत. मंत्री गुन्हेगारांसोबत फिरताना दिसतो. ललित पाटील याला मोकोका लावण्यात आला, त्याचबरोबर संजीव ठाकूर यांना सहआरोपी करून त्यांच्यावरही मोकोको लावा, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली.

त्यानंतर आज एका वृत्तवाहिणीला बोलतांना संजीव ठाकूर म्हणाले, अधिष्ठाता हे कॉलेज आणि रुग्णालयाची देखभाल करण्याचे काम करतात. व्यवस्थापक, वैद्यकीय व्यवस्थापक यांचे पूर्ण नियंत्रण रुग्णालयावर असते. डॉक्टरांचे काम रुग्णावर उपचार करणं असतं. पळवून लावण्यात कुठल्या डॉक्टरचा हात असेल असे मला वाटत नाही. कोण काय म्हणतं यावर भाष्य करू शकत नाही, असं ते म्हणाले.

पुढं बोलतांना ठाकूर म्हणाले की, ललित पाटील याच्यासारखे असंख्य आरोपी आमच्याकडे येत असतात. माझ्यासह कोणत्याही डॉक्टरचा कधीही संबंध नव्हता आणि येणार नाही. आरोप करणाऱ्यांकडे पुरावा पाहिजे. मर्यादा असल्यानं आम्ही बोलू शकत नाही. कुठल्याही रुग्णाला चांगले उपचार मिळाले पाहिजेत, हेच आमचं काम आहे. ललित पाटीलला पळवून लावण्यात आणि आर्थिक हितसंबंधामध्ये कुठल्याही सहभाग नाही, असं ते स्पष्टपणे म्हणाले.

ललित पाटीलला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळावी यासाठी मंत्र्यांचा फोन येत होता का? या प्रश्नावर संजीव ठाकूर म्हणाले की, मला कोणत्याही राजकीय नेत्यानं फोन केला नाही. आरोपीला व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आली नाही. रुग्णांची काळजी घेण्यासाठी परिचारिका असतात. रुग्ण पोलिसांच्या ताब्यात असतो.

अमली पदार्थ तस्कर मुख्य आरोपी ललित पाटील, रोहित चौधरी, शिवाजी शिंदे यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी तिन्ही आरोपींना उद्या ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Tags

follow us