मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळेचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे शहरातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील काही आश्चर्यकारक नावे या पक्षप्रवेशात सामील होणार असल्याची माहिती आहे.

News Photo   2025 12 20T131323.084

मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळेचा भाजपमध्ये प्रवेश

महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षांतराचं वार सुरू झालं आहे. (Pune) पुणे भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांच्या कन्येने राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. सायली वांजळे यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केलं आहे.

खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, पर्वती आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांतील सुमारे 22 माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील महत्त्वाचे पदाधिकारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात पक्षप्रवेश पार पडला. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मुलाने देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपचा पुणे–पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धमाका; आमदाराच्या मुलासह 22 नेते मुंबईत भाजपमध्ये

आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची खात्री वाटत असल्यामुळे इतर पक्षांतील अनेक नेते भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे.

पुणे शहरातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील काही आश्चर्यकारक नावे या पक्षप्रवेशात सामील होणार असल्याची माहिती आहे. मात्र त्यांची नावे प्रत्यक्ष प्रवेशानंतरच जाहीर केली जाणार आहेत. यापैकी काही नेते आज, शनिवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असून, उर्वरित काहींचा प्रवेश येत्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version