Download App

एक लाखाच्या मताधिक्याने शंकर जगताप विजयी होतील, खासदार श्रीरंग बारणे यांनी केला विश्वास व्यक्त

मागील 25 वर्षांपासून पडद्यामागे मी माझी भूमिका बजावली आहे. मात्र, यावेळी पहिल्यांदाच जनतेसमोर आलो आहे. महायुतीच्या घट

  • Written By: Last Updated:

Shrirang Barne campaign for Shankar Jagtap : राज्यात मागील अडीच वर्षांपासून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व रिपाइ या मित्रपक्षांनी एकदिलाने, एकविचाराने राज्याचा विकास चालवला आहे. त्याच विचाराने चिंचवडमधील महायुतीच्या घटक पक्षांनी शंकर जगताप यांचा प्रचार केला आहे. या मेहनतीमुळेच जगताप लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील, (Shankar Jagtap ) विजयाचा विश्वास आपणच उधळणार असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला आहे. ते जगताप यांच्या प्रचार रॅलीत बोलत होते.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रचारार्थ थेरगाव येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात काढण्यात आलेल्या पदयात्रेस थेरगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पदयात्रेत नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. सदर पदयात्रा गणेश नगर येथील गणपती मंदिरापासून सुरु झाली. त्यानंतर लोकमान्य कॉलनी, दुर्गा कॉलनी, किंवसरा पाटील शाळा, पंचशील कॉलनी, एकता कॉलनी, किंवसरा पाटील जिम, शिव कॉलनी, मंगल नगर, प्रेरणा शाळा, गुजर नगर, महाराष्ट्र कॉलनी, जय भवानी नगर, बेलटीका नगर, गणेश कॉलनी, कन्हैया पार्क येथे शंकर देशमुख यांनी मोठी रॅली काढली होती.

शंकर जगतापांना लाखाच्या ‘लीड’ने आमदार बनवा, मोरेश्वर भोंडवेंची जगतापांना साथ…

मागील 25 वर्षांपासून पडद्यामागे मी माझी भूमिका बजावली आहे. मात्र, यावेळी पहिल्यांदाच जनतेसमोर आलो आहे. महायुतीच्या घट पक्षातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइ (आठवले)मित्रपङांचे सर्व कार्यकर्ते देखील प्रामाणिकपणे कष्ट घेत आहेत. ते पाहता माझा विजय निश्चित आहे. खासदार बारणे यांचा मागील 25 वर्षांतील राजकीय अंदाज कधीही चुकलेला नाही अशा भावना यावेळी बोलताना शंकर देशमुख यांनी व्यक्त केल्या.

या पदयात्रेत मावळ लोकसभेचे खासदार श्री.श्रीरंगआप्पा बारणे, चिंचवड विधानसभा प्रमुख श्री.काळूराम बारणे, माजी नगरसेवक श्री.सिद्धेश्वर बारणे, श्री.अभिषेक बारणे, श्री.कैलास बारणे, श्री.संतोष बारणे, श्री.निलेश बारणे, श्री.सतीश दरेकर, श्री.तानाजी बारणे, श्री.संभाजी बारणे, माजी नगरसेविका सौ.मनीषा पवार, युवासेना सचिव श्री.विश्वजीत बारणे, शिवसेनेचे शहरप्रमुख श्री.निलेश तरस, श्री.प्रमोद पवार, श्री.नरेंद्र माने, श्री.जयदीप माने, श्री.शंकर बारणे, श्री.अशोक बारणे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us