Download App

Sharad Pawar यांनी अतुल बेनकेंना पर्याय शोधला? काँग्रेस युवा नेते म्हटले पवारांनी संधी दिल्यास…

Sharad Pawar : अजित पवार यांच्या बंडनंतर राष्ट्रवादीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार हे दोन गट पडले आहेत. यात अनेक आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली मात्र पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी आपण नेमके कोणत्या गटात आहोत? ही भूमिका स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे शरद पवारांनी जुन्नरमध्ये अतुल बेनके यांना नवा पर्याय शोधल्याची चर्चा सध्या सुरू आहे. हा पर्याय म्हणजे काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर असू शकतात. तर शेरकर यांनी देखील आमच्या कुटुंबांचे आणि पवारांचे चांगले संबंध आहेत. तसेच मला पवारांनी ऑफर दिली तर नक्कीच मी जुन्नर विधानसभा लढवेल असेही म्हटल आहे.

Taiwan Election : विल्यम लाई तैनानच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी, चीनचं टेन्शन वाढलं

यावर बोलताना शेरकर म्हणाले की, मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. गेल्या तीन पिढ्या आमच्या काँग्रेस पक्षासाठी काम करत आहेत. तसेच मी युथ काँग्रेसच्या माध्यमातून पक्षासाठी काम केलेलं आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये मी उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी केली होती. मात्र आघाडीमध्ये मला तिकीट मिळालं नव्हतं.

Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात; मारण्यासाठी गोळीबाराचा सराव केल्याचं समोर

त्याचबरोबर शरद पवार आणि आमच्या परिवाराचे अत्यंत चांगले संबंध आहेत. ते नेहमी अनेक कार्यक्रमांसाठी आमच्याकडे येतात. मात्र या संबंधांकडे राजकीय दृष्टीने पाहण्याची गरज नाही. मात्र शरद पवारांनी आतापर्यंत आपल्याला आगामी जुन्नर विधानसभा राष्ट्रवादी कडून लढवण्याची ऑफर दिलेली नाही. पण भविष्यात जरी ऑफर दिली तर बघू. मात्र अद्याप त्यांनी अशी कोणतीही ऑफर दिली नसून, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ताच आहे असेही यावेळी शेरकर यांनी स्पष्ट केलं.

तर सत्यशील शेरकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते दिवंगत काँग्रेस नेते सोपानशेठ शेरकर यांचे पुत्र आहेत. विघ्नहर साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. जुन्नर तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांनी युवकांचे अनेक काम केलेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असून शरद पवारांसोबतच्या भेटीगाठींमुळे त्यांना अतुल बेनकेंचा पर्याय म्हणूनही पाहिले जात आहे.

follow us