Taiwan Election : विल्यम लाई तैनानच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी, चीनचं टेन्शन वाढलं

  • Written By: Published:
William Lai Ching Te

Taiwan Election : तैवानच्या सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विद्यमान उपाध्यक्ष विल्यम लाई चिंग-टे (William Lai Ching-te) यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. लाई चिंग आणि त्यांचा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (डीटीपी) हे चीनचे कट्टर विरोधक मानले जातात. अशा परिस्थितीत विल्यम लाई चिंग-टे यांचा निवडणूक विजय हा चीनसाठी मोठा धक्का आहे.

Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात; मारण्यासाठी गोळीबाराचा सराव केल्याचं समोर 

विल्यम लाई चिंग-टे यांना 40.2 टक्के मते पडली, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण तैनावनध्ये 98 टक्के मतदान केंद्रांवरून निकालांची मोजणी करण्यात आली, ज्यामध्ये हे देखील दिसून आले विल्यम लाई यांचे प्रतिस्पर्धी की हौ हे तब्बल 33.4 टक्के मतांसह पिछाडीवर राहिले. दरम्यान, या निकालानंतर हौ यांनी शनिवारी आपला पराभव मान्य केला आणि विल्यम लाई चिंग-टे यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीला सत्तेतून बाहेर काढता आले नाही, त्यामुळं त्यांनी केएमटी समर्थकांची माफीही मागितली.

प्रदेशाच्या विवादित राजकीय स्थितीमुळे तैवानच्या निवडणुकांना मोठे महत्त्व आहे. 1940 च्या दशकापासून वास्तविक स्वतंत्र असताना, चीन अजूनही बेटावर आणि त्याच्या जवळच्या प्रदेशांवर दावा करतो आणि आपल्या महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी बळाचा वापर करतो.
निवडणुकीच्या रणधुमाळीत चीनने विल्यम लाई चिंग-टे यांची फुटीरतावादी म्हणून निंदा केली, जर लाई हे निवडणूक जिंकला तर ते या प्रदेशातील शांततेला धोकादायक ठरेल, असं चीनने म्हटलं होतं.

दरम्यान, आता लाई हे राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकले असून त्यांनी आपण या प्रदेशातील शांतता कायम राखू, असं आश्सासन तैवानवाशीयांना दिले.

 

follow us

संबंधित बातम्या