Sharad Pawar NCP : राज्यात येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) जाहीर करणार आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने जोरात तयारी सुरू केली आहे. तसेच इच्छुकांची चाचपणी देखील सुरु करण्यात आली आहे.
यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने (Sharad Pawar NCP) पुणे (Pune) शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले होते. माहितीनुसार, पक्षाला 10 सप्टेंबरपर्यंत शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तब्बल 41 अर्ज आले आहे. त्यामुळे पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कोणाला संधी देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
या 41 इच्छुकांची मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडून हडपसर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी पाच जण इच्छुक आहे तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून सात जण इच्छुक आहे. याच बरोबर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आठ जण तर खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नऊ जण इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँगेस ( शरद पवार गट) कडून कॉनटोन्मेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी चार- चार जण आणि कोथरूडमधून तीन तर कसबा विधानसभा मतदारसंघातून एक जण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे.
WHO कडून Mpox लसीला मान्यता, लसीकरणाची ‘या’ देशात होणार सुरुवात
आगामी विधानसभा निवडणुकीत यापैकी बहुतांश मतदारसंघात अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये लढत होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.