Sharad Pawar on Nilesh Lanke : गेल्या काही दिवसांपासून पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहेत. दरम्यान, आज लंके यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यातील कार्यालयात भेट घेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी लंके यांनी आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेवरच मी चाललो, असं म्हटलं. तर पवारांनी मी लंके यांचं स्वागत करतो, असं म्हटलं. मात्र, अद्याप लंके यांचा पक्षप्रवेश झाला नाही.
सदाशिव लोखंडेंची लोकसभेची ‘हॅट्रिक’ धोक्यात का आली…नेमकं कारण काय?
आज पत्रकार परिषदेत बोलतांना शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या कामाचं तोंडभरून कौतूक केलं. निलेश लंकेचं स्वागत करतो… लंके हे लढणारे नेते आहेत. पारनेरने माझ्या विचारांना नेहमीच पाठिंबा दिला. लंकेंच्या प्रचाराला मी पारनेरला गेलो होतो, त्यानंतर ते निवडून आले. त्यांनी पारनेरच्या जनतेच्या सेवा केली. त्यांची जनतेची बांधिलकी होती. ज्यांची जनतेची बांधिलकी असते, त्यांना आमची साथ असते, असं पवार म्हणाले.
तर लंके म्हणाले, मी पवार साहेबांसोबतच आहे. पवार साहेबांनीच माझ्या प्रचार यात्रेचा शुभारंभ केला होता. कोरोनाच्या काळात काय होतं तुम्हाला माहिती आहे. त्यावेळी पवार साहेबांनी ज्या योजना राबवल्या त्याचा फायदा झाला. पवार साहेबांचा नेहमीच आशिर्वाद लाभला आहे. कोविड काळात केलेल्या कामाचं पुस्तक केलं, त्याचं प्रकाशन पवारांच्या हस्ते करण्याचा मानस आहे, यासाठी त्यांची भेट घेतली, असं पवार म्हणाले.
पवार साहेबांच्या कामाचे लहानपणापासूनच कौतुक होतं. मी साहेबांचं नेतृत्व कधीच सोडले नाही. माझ्या ऑफिसमध्ये अजूनही त्याचा फोटो आहे. मी माझ्या सहकाऱ्यांसोबत खासदारची किंवा कोणत्याही निवडणुकीची चर्चा केलेली नाही. सर्वसामान्य जनतेला जो घेऊन जो चालणारा नेता आहे, त्यांच्यासोबत मी आहे, असं लंके म्हणाले.
जयंत पाटील काय म्हणाले?
निलेश लंके नगरमधील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. ते सामान्यांना वाटणारे नेते आहेत. संकटसमयी धावून येणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. ते आज शरद पवारांना भेटायला आहे आणि त्यांनी इथून पुढे शरद पवार साहेबांच्या विचारधारेने चालण्याचा निर्णय घेतला आहे.