सदाशिव लोखंडेंची लोकसभेची ‘हॅट्रिक’ धोक्यात का आली…नेमकं कारण काय?

सदाशिव लोखंडेंची लोकसभेची ‘हॅट्रिक’ धोक्यात का आली…नेमकं कारण काय?

प्रविण सुरवसे

Shirdi Loksabha : लोकसभा निवडणुका या येत्या काळात होणार असल्याने त्यानुषंगाने राजकीय इच्छुक उमेदवारांकडून धावपळ सुरु आहे. शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi Loksabha) शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. यातच शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv lokhande) हे पुन्हा एकदा लोकसभेसाठी तयारी करत आहे. तीन टर्म आमदारकी व दोन टर्म खासदारकी भूषविणारे लोखंडे यांची खासदारकीची तिसरी टर्म मात्र धोक्यात आली आहे. लोकसभेची हॅट्रिक करण्यापूर्वीच पक्षातूनच लोखंडे यांना विरोध होऊ लागला आहे. पदाधिकाऱ्यांची नाराजी व जनसंपर्काचा अभाव यामुळे लोखंडेच्या उमेदवारीला नाकारले जात आहे. दरम्यान मोठी राजकीय कारकीर्द असलेल्या लोखंडे यांची लोकसभा उमेदवारीची विकेट पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Shambhuraj Desai : शिवतारेंचा निर्णय व्यक्तिगत; देसाईंच्या सूचक प्रतिक्रियेने अजितदादांचं टेन्शन वाढलं

आता भाजपकडून शिर्डी लोकसभेवर दावा केला जाऊ शकतो अशी देखील चर्चा आहे. दरम्यान मोठी राजकीय कारकीर्द असलेले लोखंडे यांची विकेट पडण्यामागे नेमकी काय आहे कारणे? असे झाल्यास महायुतीचा उमेदवार कोण असणार व रणनीती काय असणार? सविस्तर पाहुयात..

तीन टर्म आमदार तर दोन टर्म खासदार
शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार असलेले सदाशिव किसन लोखंडे हे एक स्वसामन्य राजकारणी आहे. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येत लोखंडे यांनी राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. भाजपमधून राजकारणाची सुरुवात करत 1995 च्या निवडणुकीत त्यांनी कर्जत -जामखेड विधानसभा लढवली व आमदार झाले. सलग तीन वर्षे 1999 व 2004 साली त्यांनी आमदारकी भूषवली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014 ला भाऊसाहेब वाकचौरे यांना लोकसभेचे तिकीट देणार तोच त्यांनी पक्षांतर केले व लोखंडे यांची वर्णी लागली. 2014 व 2019 साली मोदी लाटेत लोखंडे हे खासदार झाले. 2024 ला देखील त्यांना लोकसभेचे वेध लागले मात्र लोकसभेची हॅट्रिक करण्यापूर्वीच त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

राहुल गांधी महाराष्ट्रात येताच काँग्रेसला भगदाड; भाजपाचा झेंडा हाती घेणारे पद्माकर वळवी कोण ?

लोखंडेंना विरोध, तर भाजपचा जागेवर दावा
गेली दोन टर्म खासदारकी भूषविणारे सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात मतदार संघामध्ये नाराजीचा सूर आहे. मतदार संघामध्ये लोखंडे यांचा वावरच नसतो तसेच त्यांचा जनसंपर्क हा राहिलेला नाही. यामुळे लोखंडे यांच्याविरोधामधील वातावरण शिर्डीमध्ये निर्माण झाले. दरम्यान शिर्डी मतदारसंघ भाजपाला मिळावा यासाठी महायुतीत भाजपा नेते आग्रही आहेत. लोखंडे यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी लोखंडे नको, दुसरा सक्षम उमेदवार द्या अशी मागणी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे. तर आता याच गोष्टीचा फायदा घेत आता भाजप या जागेवर दावा करू लागला आहे. भाजपकडून काही इच्छुक उमेदवारांची नावे देखील समोर आली आहे. मात्र या जागेबाबत अद्याप अधिकृत रित्या महायुतीकडून कोणत्याही उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आलेले नाही. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुरु असलेली दुफळीचा फायदा हा भाजपला होऊ शकतो.

शिर्डीत राजकारण रंगणार
शिर्डी हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो कारण गेली दोन टर्म शिर्डीकरांनी शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिले. मात्र शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर शिंदे गट व ठाकरे गट या दोन्ही पक्षांनी शिर्डी लोकसभेवर लक्ष केंद्रित केले. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र वाकचौरे यांच्याविरोधात देखील पक्षातूनच बंडाची भूमिका काहींकडून घेण्यात आली आहे. दलबदलूंपेक्षा हि जागा महाविकास आघाडीने काँग्रेससाठी सोडावी अशी मागणी उत्कर्षा रुपवते यांनी केली आहे. दुसरीकडे भाजपकडून देखील या जागेची चाचपणी सुरु आहे. तर शिर्डीच्या जागेसाठी आरपीआयचे रामदास आठवेल देखील इच्छुक आहे. महायुतीकडून आरपीआयसाठी हि जागा सोडण्यात यावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे. दरम्यान अद्याप उमेदवार अधिकृत रित्या जाहीर झाले नाही यामुळे पक्षांकडून कोणाला संधी देण्यात येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube