Download App

महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच, एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही ; शरद पवार

परभणी आणि बीडमधील घटना दुर्दैवी आहेत. मात्र, परभणीसह इतर भाग शांत झाला पाहिजे‌. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. - शरद पवार

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : परभणी आणि बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटनांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर आणि सोमनाथ सूर्यवंश (Somnath Suryavanshi) यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूमुळे राज्यभरात असंतोष असल्याचं पहायला मिळतंय. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar यांनी भाष्य केलं.

वरदान नाही…शापाचा परिणाम आहे ‘महाकु्ंभ’; पौराणिक कथा जाणून घ्या 

शरद पवारांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्युमुळे पसरलेल्या असंतोषाविषयी बोलताना ते म्हणाले की, परभणी आणि बीडमधील घटना दुर्दैवी आहेत. मात्र, परभणीसह इतर भाग शांत झाला पाहिजे‌. मी इथे येण्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ही परिस्थिती शांत झाली पाहिजे, याबाबत त्यांच्याशी बोललो आहे. आपले राजकीय विचार वेगळे असतील, पण महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी नाही, असं पवार म्हणाले.

महाकुंभमेळ्यातून भाविकांना मिळणार मोक्ष! प्रयागराजमधील ८४ स्तंभांची खासियत तरी काय? 

फुले-शाहु-आंबेडकारांचा विचार पवारांनी पुढे नेला – कसबे
शरद पवारांनी फुले-शाहु-आंबेडकारांचा विचार पुढे नेण्याचे काम केलंय.‌ शरद पवारांनी जशी ना.धो. महानोरांना विधानपरिषदेवर संधी दिली, तशी पंडित जवाहरलाल नेहरुंनी कवी दिनकर यांना राज्यसभेवर संधी दिली होती. तर एकदा पंडित नेहरुंना कवी संमेलनाला आमंत्रित करण्यात आलं. स्टेजवर जाताना पंडित नेहरुंचा पाय घसरला तेव्हा कवी दिनकर यांनी त्यांना पकडून ठेवलं आणि पडण्यापासुन वाचवलं. तेव्हा पंडित नेहरु म्हणाले की कवीराज राजकारणात जर माझ्यासकट कुठल्याही राजकारण्याचा पाय घसरला तर आम्हाला असेच सावरा. पंडित नेहरुंनंतर साहित्यिकांना जर असं सांगण्याच धाडस जर कोणात असेल तर ते शरद पवारांमध्ये आहे, असं रावसाहेब कसबे म्हणाले.

सर्व आरोपींविरोधात मोक्का दाखल
मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर सात आरोपींविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतिक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे, सिद्धार्थ सोनावणे या सात जणांविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे.

follow us