Download App

Shirur Loksabha अजितदादांकडे गेल्यास आढळरावही अजितदादांच्या गटात जाणार? म्हणाले चर्चेला अजून…

  • Written By: Last Updated:

Shirur Loksabha : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये शिरुर मतदारसंघावरुन (Shirur Loksabha) चांगलंच घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे विद्यमान खासदार असून या मतदारसंघासाठी अजित पवार गटाने रणशिंग फुकलं आहे. मी महायुतीचा उमेदवार निवडून आणणार असल्याचं खुलं आव्हानच अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं आहे. मात्र यामुळे शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांची चांगलीच कोंडी झाल्याचे पाहायला मिळते.

Devendra Fadanvis ठरले जपानच्या कोयासन विद्यापीठाची ‘मानद डॉक्टरेट’ मिळवणारे पहिले भारतीय

कारण जर शिरूरची जागा अजित पवार यांच्या गटाला मिळाली. तर आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. यावर आढळराव यांनी प्रतिक्रिया देत एक प्रकारे राष्ट्रवादी प्रवेश करण्याची संकेतच दिले आहेत. यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, या जागेवर आमचा सुद्धा हक्क आहे. मात्र तीनही पक्ष एकत्र बसून जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. ही जागा अजित पवार यांच्या गटाला देण्याचे ठरलं. तर उमेदवार देखील तीनही पक्ष मिळून ठरवतील. असं अढळराव म्हणाले.

तसेच पुढे असं देखील म्हणाले की, मात्र मी अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र या चर्चेला अजून वेळ आहे. कारण जागा वाटप अजून झालेलं नाहीये. उमेदवार ही ठरलेला नाही. त्यामुळे हे जेव्हा ठरेल त्यावेळी त्यावर चर्चा करू. असे यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आहेत. मात्र या वक्तव्यामुळे आढळराव पाटील अजित पवार यांच्या गटात असल्याची शक्यता वर्तनात येते आहे.

कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच; विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला

दरम्यान यासंदर्भात शिवाजीराव आढळराव पाटलांनी लेट्सअप मराठीशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, अजितदादा मागील अनेक महिन्यांपासून शिरुर मतदारसंघ मागत आहेत. त्यांनी मागणं हे काय चूकीचं नाही. शिंदे गट आमच्या परिने प्रयत्न करतंय की ही जागा आमच्याकडे राहील. या जागेसाठी अनेकांनी दावा केला, त्यामुळे आता महायुतीचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेणार आहेत. जर अजितदादांना ही जागा मिळाली तर मी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आढळरावांनी सांगितलं आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज