Shirur Loksabha : शिरुरची जागा अजितदादांकडे गेल्यास आढळराव काय करणार?

Shirur Loksabha : शिरुरची जागा अजितदादांकडे गेल्यास आढळराव काय करणार?

Shirur Loksabha : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये शिरुर मतदारसंघावरुन (Shirur Loksabha) चांगलंच घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे विद्यमान खासदार असून या मतदारसंघासाठी अजित पवार गटाने रणशिंग फुकलं आहे. मी महायुतीचा उमेदवार निवडून आणणार असल्याचं खुलं आव्हानच अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं आहे. त्यावरुन अमोल कोल्हे-अजित पवार वाद सुरु असतानाच आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनीही (Shivajiro Adhalrao Patil) उडी घेतली आहे. या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटलांनीही जोरदार तयारी केल्याने आता ही जागा अजितदादांकडे गेल्यास काय करणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात शिवाजीराव आढळराव पाटलांनी लेट्सअप मराठीशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे.


जरांगेंचा वार-भुजबळांचा पलटवार; ‘काही दिवसांनी भुजबळ भजे अन् जिलेबीचे कागदं खाणार’

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, अजितदादांची मागणी चुकीची नसून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पाहिजे ते करणार असल्याचा निर्धार आढळरावांनी व्यक्त केला आहे. मागील पाच वर्षांपासून मतदारसंघात मी काम करीत आहे. लोकांच्या अडचणी मी सोडवत असून विद्यमान खासदार मतदारसंघात न फिरकल्याने ही माझ्यावर जबाबदारी आली आहे . अजितदादांनी केलेले आरोप खरे आहेत हे माझंच नाहीतर तर जनतेचं म्हणणं असल्याचं आढळरावांनी सांगितलं आहे.

‘CM शिंदे अन् अजितदादांना भाजपची स्क्रिप्ट वाचावीच लागते’; रोहित पवारांची जळजळीत टीका

येत्या 27 तारखेला खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चावरुनही आढळरावांनी सडकून टीका केली आहे. मागील पाच वर्ष आम्ही निवडून दिलेला खासदार कुठंय? असा आक्रोश शेतकरी करीत होता तेव्हा खासदार कुठं होते? असा सवाल आढळरावांनी केला आहे. आता निवडणूक जवळ आली म्हणून हे खासदार आता लोकांच्या पुढे कसं जायचं? म्हणून आक्रोश मोर्चा घेऊन येत असून अमोल कोल्हेंनी जनतेची शुद्ध फसवणूक केलीयं. मतदारसंघात विकासकामेही केलेली नसल्याचा आरोपही आढळरावांनी केला आहे.

“दादा खरोखर मोठे नेते, ते माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आव्हान देणार नाहीत” : कोल्हे डिफेन्सिव्ह भूमिकेत

महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणारच :
अजितदादा मागील अनेक महिन्यांपासून शिरुर मतदारसंघ मागत आहेत. त्यांनी मागणं हे काय चूकीचं नाही. शिंदे गट आमच्या परिने प्रयत्न करतंय की ही जागा आमच्याकडे राहील. या जागेसाठी अनेकांनी दावा केला, त्यामुळे आता महायुतीचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेणार आहेत. जर अजितदादांना ही जागा मिळाली तर मी उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आढळरावांनी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube