Ajit Pawar : अजित पवारांचा दिल्ली दौरा रद्द; म्हणाले, आम्हाला वेळ दिली होती पण…
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज (15 डिसेंबरला ) दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र अचानक हा दौरा रद्द करण्यात आला आहे. हा दौरा का रद्द करण्यात आला? त्यावर प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी हा दौरा रद्द होण्यामागील कारणं सांगितलं आहे. ते नागपूर येथे विधानभवन परिसरात माध्यम प्रतिनिधींशी साधलेल्या संवादात बोलत होते.
BCCI चा मोठा निर्णय! सचिनप्रमाणेच धोनीचा सन्मान; सात नंबरची जर्सी निवृत्त
याबद्दल सांगतनाना अजित पवार म्हणाले की, आज (15 डिसेंबरला ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिलीप वळसे पाटील राधाकृष्ण विखे पाटील, मी आम्हा सर्वांनी कांदा, इथेनॉल सह पाच सहा प्रश्नांवर कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा केली होती. त्याच विषयांच्या संदर्भात आमचा दिल्ली दौरा होता. सकाळी 10 वाजता आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार होतो. मात्र त्यानंतर हा दौरा रद्द झाला आहे. कारण अमित शाह यांना दुसरी काम असल्याने त्यांनी हा दौरा सोमवारी किंवा मंगळवारी ठेवण्यात यावा असं सांगितलं. अशी माहीती आपला दिल्ली दौरा रद्द झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
Manoj Jarange : ‘आरक्षणाचं काय केलं, 17 डिसेंबरपर्यंत सांगा, अन्यथा’… जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम !
दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलेले होते. कारण राज्यात दुसरीकडे आमदार अपात्रता प्रकरणावरच्या निकालासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये शिंदेंसह त्यांचे आमदार अपात्र ठरले तर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? त्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौरा होणार आहे. त्यामुळे या शंकांना बळ मिळाले होते. पण हा दौरा अचानक रद्द कऱण्यात आला आहे.
तसेच यावेळी महायुतीच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत देखील अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मेळावे सभा होणार. महायुतीमध्ये जागावाटपात काहीही वाद होणार नाही. समंजसपणे भूमिका घेणार.जागावाटपात कोणी धाकटा, मोठा असं नाही, सर्व व्यवस्थित करू. असं पवार म्हणाले आहेत.