अमोल कोल्हेंच्या भाजप प्रवेशावर आढळरावांचे थेट उत्तर, म्हणाले तर मला…

Shivajirao Aadhalrao Patil On NCP leader Amol Kolhe :  शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशावर थेट भाष्य केले आहे. यावेळी ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लढताना डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 05T181123.062

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 05T181123.062

Shivajirao Aadhalrao Patil On NCP leader Amol Kolhe :  शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशावर थेट भाष्य केले आहे. यावेळी ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून लढताना डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला आहे. यानंतर आता गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे भाजपमध्ये येणार अशा चर्चा केल्या जात आहेत. यावर त्यांनी भाष्य केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत आल्यास काय होईल, यावर देखील ते बोलले आहेत.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल असे वाटत नाही. एकत्र आल्यास आमच्या शिवसेनेवर त्याचा काही परिणाम होईल, असे काही वाटत नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे गट एकत्र आल्यास आनंद होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच यावेळी त्यांनी अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर या विषयावर देखील बोलले आहेत.

मोठी बातमी! शरद पवारांनी अखेर राजीनामा घेतला मागे; अध्यक्षपदाची कमान पुन्हा हाती

डॉ. अमोल कोल्हे भाजपमध्ये येतात की नाही माहीत नाही. त्यांची भाजपशी जवळीक वाढली असेल. पण, शिरुरची जागा शिवसेनेची आहे. भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हे यांची समजूत काढावी. मी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. कोल्हे भाजपमध्ये आले तर चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले आहेत.

Sharad Pawar Resignation : पवारांनी भाकरीऐवजी तवाच का फिरवला? जयंत पाटलांनी सांगितलं कारण…

आढळराव म्हणाले,की शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कशामुळे दिला याबाबत काहीच सांगता येत नाही. अखंड राष्ट्रवादी नव्हे तर अजित पवार भाजपसोबत येतील अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी एकत्र येईल असे वाटत नाही. एकत्र आल्यास आमच्या शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीर आहेत. भाजप-शिवसेना (शिंदे गट) – राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर त्याचा आम्हाला आनंदच होईल. भविष्यात काय होईल माहिती नाही. संधी मिळाली तर लढेनच.

Exit mobile version