‘जय श्रीराम’ च्या जयघोषाने दुमदुमलं पुणे स्टेशन; देवधरांच्या उपस्थितीत रामसेवक अयोध्येला रवाना

पुणे : परिसर पुणे स्टेशनचा आणि मुखी राम नाम निमित्त होतं ते अयोध्येला सोडण्यात आलेल्या विशेष ट्रेनचं. नुकतचं अयोध्येत भव्य राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो जणांनी अक्षता वितरणाच्या अभियानात सहभाग घेतला होता. या सर्वांसाठी पुणे स्थानकाहून अयोध्येसाठी विशेष आस्था ट्रेन (दि.14) रवाना करण्यात आली. या […]

'जय श्रीराम' च्या जयघोषाने दुमदुमलं पुणे स्टेशन; देवधरांच्या उपस्थितीत रामसेवक अयोध्येला रवाना

'जय श्रीराम' च्या जयघोषाने दुमदुमलं पुणे स्टेशन; देवधरांच्या उपस्थितीत रामसेवक अयोध्येला रवाना

पुणे : परिसर पुणे स्टेशनचा आणि मुखी राम नाम निमित्त होतं ते अयोध्येला सोडण्यात आलेल्या विशेष ट्रेनचं. नुकतचं अयोध्येत भव्य राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो जणांनी अक्षता वितरणाच्या अभियानात सहभाग घेतला होता. या सर्वांसाठी पुणे स्थानकाहून अयोध्येसाठी विशेष आस्था ट्रेन (दि.14) रवाना करण्यात आली. या गाडीला भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांच्या हस्ते रेल्वे इंजिन पूजन व श्रीफळ चढवून रामसेवकांना ‘जय श्रीराम’ च्या जय घोषात निरोप देण्यात आला.

नऊ वर्षांची दुर्वा अन् नव्वद वर्षांची दुर्गा सुनील देवधरांच्या भेटीला; कारणही आहे खास

देवधरांच्या उपस्थितीत अयोध्येला रवाना करण्यात आलेल्या आस्था ट्रेनमध्ये अयोध्येतील भव्य राममंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अक्षता वितरण अभियानात सहभागी झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील रामसेवक, कारसेवक, विश्व हिंदू परिषदेचे सुमारे पंधराशे कार्यकर्ते तसेच विविध साधु संतांचा समावेश आहे. अयोध्येला ट्रेन रवाना होण्यापूर्वी पुणे स्टेशन परिसरात राम नामाचा जयघोष करण्याता आला. त्यामुळे काही काळ स्टेशनच्या परिसरात भक्तीमय वातावरण पसरले होते.

‘निष्ठावंत मेधाताईंच्या उमेदवारीचं स्वागत’; उमेदवारी जाहीर होताच देवधरांची पहिली प्रतिक्रिया

अयोध्येला विशेष ट्रेन रवाना करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संपर्क प्रमुख मिलिंदजी देशपांडे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री संजय मुद्राळे, सहमंत्री अॅड. सतीश कोरडे, विहिंप प्रांत विशेष संपर्क प्रमुख किशोर चव्हाण, विहिंप प्रांत प्रचार प्रमुख तुषार कुलकर्णी, राममंदिर निमंत्रण व अक्षता वितरण अभियानाचे पुणे महानगर सहसंयोजक अभिजित बर्वे आदी पदाधिकारी, मान्यवरांसह अनेक नागरिक, स्वयंसेवक आणि रामसेवक उपस्थित होते.

Exit mobile version