Sunil Shelke on Sharad Pawar : शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके ( Sunil Shelke ) यांना मला ‘शरद पवार’ म्हणतात, हे लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर मी कोणाला सोडत नाही. असं म्हणत इशारा दिला. त्यावर आता सुनील शेळके यांनी देखील मी दम दिल्याचा पुरावा द्या अन्यथा खोटे आरोप केल्याचं कबूल करा. असं म्हणंत थेट शरद पवारांना आव्हान दिलं आहे. शेळके हे पत्रकार परिषदेत बोलत होते.
काय म्हणाले सुनील शेळके?
शेळके म्हणाले की, माझ्या मावळ मतदार संघामध्ये पवार साहेबांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक आयोजित केली होती. या बैठकीचा आणि मेळाव्याचा ज्यांनी आयोजन केले. त्यांनी साहेबांना काही माहिती आठ दिवसांपूर्वी दिली. त्यांनी सांगितलं की, अजित पवार गटातील काही कार्यकर्ते शरद पवार गटामध्ये यायला तयार आहेत. त्यांना पक्ष प्रवेश करायचा असल्याची खोटी माहिती पवार साहेबांना देण्यात आली. त्यासाठी त्यांना मावळमध्ये निमंत्रित करण्यात आलं.
मात्र ऐन कार्यक्रमात केवळ 35 ते 40 च कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी देखील संबंधित आयोजकांनी पवार साहेबांना चुकीची माहिती दिली की, अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाला येऊ नये म्हणून दम दिल्याचं काम केलं. त्यावर पवार साहेबांनी देखील लगेच प्रतिक्रिया दिली. पवार साहेब आमच्यासाठी आजही आदरणीय आहेत उद्याही असतील मात्र त्यांनी वक्तव्य करताना शहानिशा करायला हवी होती.
“मी बोलतो तेव्हा पक्ष बोलतो, माझं मत हेच पक्षाचं मत”; जागावाटपावरुन भुजबळांनी पुन्हा डिवचलं
त्यांचा 50 55 वर्षांचा इतिहास पाहिल्यास त्यांनी कधीही व्यक्तिगत कोणत्याही पदाधिकाऱ्यावर टीका केली नव्हती. पण माझ्या बाबतीत त्यांनी असं वक्तव्य का केलं? याचं मला आश्चर्य वाटतं. या बाबतीत मी त्यांना जाऊन भेटणार आहे. त्यांना विचारणार आहे की, मी कुणाच्या वाटेला गेलो? माझी काही चूक झाली? आपण सांगावं. त्यांनी जे वक्तव्य केले. त्याची मी नक्कीच दखल घेणार. पुढील आठ दिवसात. मी अशा प्रकारे कुणाला दम दिला असेल तर असा व्यक्ती समोर आणावा. अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की, साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले. त्यामुळे त्यांनी एकतर पुरावे दाखवावेत किंवा आपण हे खोटे वक्तव्य केल्याचं त्यांनी कबूल करावं. असा आव्हानच यावेळी सुनील शेळके यांनी थेट शरद पवारांना दिले.
काय म्हणाले शरद पवार?
आजच्या लोणावळ्यातील मेळाव्यासाठी तुम्ही येऊ नये यासाठी आमदारांनी आणि काहीजणांनी दमदाटी केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, टीका करणाऱ्यांना फोन करण्यात आल्याची तक्रार काही कार्यकर्तांनी माझ्याकडे केल्याचे पवारांनी सांगितले. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर त्यावर टीका करायची नाही का असा सवाल करत सुनील शेळकेंना (Sunil Shelke) फैलावर घेतले. ते म्हणाले की, तु आमदार कुणामुळे झाला त्यावेळी सभेला इथे कोण आलं होतं. त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता असा खडा सवाल पवारांनी आमदार सुनील शेळकेंना उद्देशुन केला.