Download App

शिवराज्याभिषेक सोहळ्यात तटकरेंना बोलू दिले नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Shivrajyabhishek Sohala 2023 : रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराच्याभिषेक सोहळ्याचे (Shivrajyabhishek Sohala 2023) आयोजन केले होते. यामध्ये स्थानिक खासदार म्हणून बोलू दिले नाही म्हणून राष्ट्रावदीचे नेते सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच कार्यक्रम संपताच तटकरे तातडीने निघून गेले. यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे-फडणवीस सरकावर जोरदार टीका केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की सुनिल तटकरे हे स्थानिक खासदार असताना बोलायला दिले नाही याचे मला आश्चर्य वाटत नाही. स्थानिक लोकांचा आदर करण्याची पध्दत यांच्याकडे नाही. कुठेही गेले तरी लोकांचा अपमानच करतात असा थेट हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ईडी सरकारवर केला.

छत्रपती शिवरायांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा! राज ठाकरे सहकुटुंब रायगडावर, पाहा फोटो

महाराष्ट्र सदनात कार्यक्रम झाला तिथेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा ज्यापध्दतीने हटवण्यात आला हे अतिशय दुर्दैवी आहे. महापुरुषांचा अपमान करणे किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींचा अपमान करणे ही ईडी सरकारची पध्दत आहे आणि महाराष्ट्राचा अपमान कसा होईल त्याच्यातच केंद्र सरकारला आनंद मिळतो हे त्यांच्या वागणूकीतून दिसते असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

गरीब कष्ट करणार्‍यांनी मेरीटवर नोकर्‍या मिळवल्या आहेत. आठ महिने हक्काचा पगार त्यांना मिळत नाही. सगळ्या गोष्टी विकण्याचे एक कटकारस्थान केंद्र सरकार करत आहे त्यातून महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. हे अतिशय दुर्दैवी असून सातत्याने महाराष्ट्राला केंद्र सरकार जी वागणूक देत आहे त्या धोरणाचा जाहीर निषेध खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यात नाराजी नाट्य; गंभीर आरोप करत तटकरेंचा काढता पाय

एनटीसीच्या चार हजार गिरणी कामगारांना गेले आठ महिने हक्काचा पगार मिळाला नाही त्याबद्दल आज एनटीसी हाऊसच्या बाहेर कामगारांनी आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Tags

follow us