सुप्रिया सुळे म्हणाल्या…तर शिक्षणाला काही अर्थ नाही

MP Supriya Sule : महिलांच्या हक्कासाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या व न्यायासाठी प्रसंगी आंदोलन पुकारणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांची एक कृती सध्या चर्चेत आहे. समाजातील स्त्रिया यांना नेहमीच योग्य वागणूक दिली पाहिजे. त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे. मात्र समाजात सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर त्या शिक्षणाला काही अर्थ नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अंधारेंची […]

Untitled Design   2023 05 19T134404.269

Untitled Design 2023 05 19T134404.269

MP Supriya Sule : महिलांच्या हक्कासाठी नेहमी अग्रेसर असणाऱ्या व न्यायासाठी प्रसंगी आंदोलन पुकारणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांची एक कृती सध्या चर्चेत आहे. समाजातील स्त्रिया यांना नेहमीच योग्य वागणूक दिली पाहिजे. त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे. मात्र समाजात सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर त्या शिक्षणाला काही अर्थ नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

अंधारेंची दादागिरी! सोफा, पैशांची मागणी अन् बरचं काही; आप्पासाहेबांकडून आरोपांची माळ

बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी वरकुटे बुद्रुक गावाला भेट दिली. त्याठिकाणी पतीनिधनानंतर एकल झालेल्या सुलन सुदाम देवकर,सारिका महेश चितळकर,सोनाली राजेश गायकवाड, कल्पना शशिकांत चव्हाण आणि आशा अमोल पोळ या भगिनी त्यांना भेटल्या.

‘सुषमा आक्कांचं जिकडं राशन तिकडं भाषण’; शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारेंची सडकून टीका

समाजातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती स्त्री असो की पुरुष, आपल्या संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे सांगत खासदार सुळे यांनी पतीनिधनानंतर कोणत्याही महिलेला समाजाने पुर्वीइतक्याच सन्मानाने वागविले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आणि त्या सर्व महिलांना कुंकू लावले.

आर्यन खानला मोफत तिकीटं, ड्रग्सचा पुरवठा अन्….; समीर वानखेडेच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून धक्कादायक खुलासा

अतिशय भावूक करणारा तो प्रसंग होता. सामाजिक परिवर्तन होणार नसेल तर शिक्षणाला अर्थ नाही, असे सांगत सुळे यांनी यावेळी एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी आपण सर्व सुशिक्षित नागरीकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Exit mobile version