पुणेः ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना पुन्हा एकदा सुनावले आहे. संजय शिरसाट यांच्याकडे कोट्यवधी रुपये असले तरी त्यांच्याकडे संस्काराचा लवलेश नाही. हा माणूस कफल्लक आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
उदय सामंत, छत्रपती संभाजीराजे थोडक्यात बचावले, स्पीड बोटला अपघात!
सुषमा अंधारे यांनी लेट्सअपशी संवाद साधताना आमदार शिरसाट यांच्यासह सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्याकडे किती करोडे रुपये असले तरी त्यांच्याकडे संस्कार नाहीत. कफल्लक लोकांची जेवठी एेपित हा तेवढा दावा मी दाखल करत आहेत. त्यांच्याविरोधात केवळ तीन रुपयांचा दावा दाखल करत आहे. माझ्या अब्रुला मोल नाही का, असा सवाल अंधारे यांनी केला आहे.
Jitendra Awhad यांचा आरोप : सनातनी मनुवादी ९७ टक्के लोकसंख्येला आजही शूद्रच समजतात!
सत्ताधारी हे दुजाभावाने वागत असल्याचा आरोप करत सुषमा अंधारे म्हणाले, सत्ताधारी गटातील महिला असेल तर लगेच गुन्हा दाखल केला जातो. परंतु विरोधक असेल तर गुन्हा ही दाखल होत नाही. पोलीस ही या प्रकरणात दाद देत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दुजाभाव करत आहेत. हे वाईट आहे. त्याविरोधात पाऊल उचलत आहे. त्यामुळेच न्यायालयात दावा दाखल करत असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.
संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना काही अपशब्द वापरले होते. त्यावर शिरसाट यांच्यावर विरोधक तुटून पडले आहेत. सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांनाही सुनावले आहे. आमदार संजय शिरसाट यांनी ही सुषमा अंधारे यांना काहीही वाईट बोलले नाही. वाईट बोलले सिध्द केले तरी मी आमदारकीचा राजीनामा देईल, असे चॅलेंज दिलेले आहे.