Jitendra Awhad यांचा आरोप : सनातनी मनुवादी ९७ टक्के लोकसंख्येला आजही शूद्रच समजतात!

Jitendra Awhad यांचा आरोप : सनातनी मनुवादी ९७ टक्के लोकसंख्येला आजही शूद्रच समजतात!

Jitendra Awhad : कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे भोसले या नाशिक येथील काळाराम मंदिरात पुजेसाठी गेल्या होत्या. मात्र, वेदोक्त आणि पुराणोक्त या मंत्रोच्चारावरुन तेथील पुजारी महंत सुधीरदास यांच्याबरोबर त्यांचा वाद झाल्याची घटना समोर आली. छत्रपती शाहु महाराज यांना देखील या वेदोक्त प्रकरणावरुन बराच त्रास झाला होता. या प्रकरणाची आठवण यानिमित्ताने झाली. या वादात अनेकांनी उडी घेतली असून त्यानंतर पुन्हा एकदा या वेदोक्त प्रकरणावरुन महाराष्ट्रात गदारोळ सुरु झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक लेख लिहिला असून खास ‘लेट्सअप’च्या वाचकांसाठी देत आहोत…!

वेदोक्त आणि पुराणोक्त हा वाद महाराष्ट्राला काही नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर कायमच हा वाद वर उफाळून येत असे. महाराष्ट्राच्या आठवणीतून हे कधीच जाऊ शकत नाही की, सनातन मनुवाद्यांनी महाराजांना शूद्र लेखत महाराजांच्या राज्याभिषेकाला नकार दिला होता. तेव्हा गागाभट्टांना आणून महाराजांनी राज्याभिषेक करुन घेतला आणि दुसरा राज्याभिषेक हा शाक्त पद्धतीने केला. हे वेदोक्त आणि पुराणोक्त प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न जरी केला तरी आजच्या पिढीला तितका समजण्यासाठी व समजून घेण्यासाठी वेळच नाही. वेद हे अतिप्राचीन आहेत. तर पुराण हे साधारण इ. स. १५०० पूर्वीचे आहेत. (Before Christ).

वेद हे पूर्वीपासून लोकांना माहिती आहेत. काही सनातान्यांच फक्त त्याचा अभ्यास करण्याची परवानगी होती आणि त्यामुळे वेद हे त्याकाळी सर्वसामान्यांपासून लांबच राहिले आहे. कारण, सर्वसामान्यांना संस्कृतही शिकता येत नव्हते. तेव्हापासून पुजेच्या दोन पद्धती निर्माण झाल्या. त्यामध्ये एक पुराणोक्त पद्धती आणि दुसरी वेदोक्त पद्धती. वेदोक्त पद्धतीने पुजा ही काही जणांनाच लागू होईल असं सनातन मनुवाद्यांच म्हणण होतं. ज्यांना वेदोक्त लागू होतं त्यांच्या व्यतिरीक्त म्हणजे जवळ-जवळ ९७ टक्के लोकसंख्येला पुराणोक्त पुजा लागू होईल, असं त्यांच म्हणणं होते.

संयोगीताराजे प्रकरणात संभाजीराजेंची एन्ट्री – Letsupp

हे लक्षात घेण्यासारखं आहे की, महाराष्ट्रामध्ये राज्य करणारे अनेक राजे होऊन गेले. पण, बहुतांशी राजे हे या मातीतील नव्हते. भारतातही अनेक राजे होऊन गेले. त्याच्यातील पहिले घराणे ‘नंद घराणे’ हे ब्राह्मण नव्हते. उर्वरीत राजे हे बहुसंख्यांक ब्राह्मणच होते. महाराष्ट्रात पण, अशीच परिस्थिती होती. आणि पहिल्यांदा एक क्षत्रिय राजा शपथविधीच्या लायक झाला. त्याने स्वत:च साम्राज्य तयार केलं आणि त्याच्यावर छत्रपती म्हणून राज्याभिषेक करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा इथल्या सनातन मनुवाद्यांनी त्यांना शूद्र म्हणून हिणवत त्यांना राज्याभिषेक नाकारला. त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतरचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. पण, त्यानंतर पेशवेंनीच जवळ-जवळ १८१८ पर्यंत छत्रपती संभाजीराजे यांच्यानंतर मराठ्यांची गादी सांभाळली आणि १८४० पासून तर त्यावर अधिकच घट्ट पकड केली.

विश्वनाथ पंत ते बाजीराव हा काळ जरी पेशवेंच्या हातात होता. तरी ते मराठा गादीशी ते अतिशय प्रामाणिक होते. पण, नंतरच्या काळात ते घडलं नाही व इथल्या सनातन्यांची समाजावरची पकड आणखी मजबूत होत गेली. शाहू महाराज पंचगंगेकाठी स्नान करीत असताना तिथे उपस्थित असलेले नारायण भट हे तिथे जे मंत्र म्हणत होते तेच संस्कृत पंडीत राजाराम शास्त्री भागवत ऐकत होते आणि त्यांनी शाहू महाराजांना सांगितले की, हा पंडीत जे मंत्र म्हणत आहे. ते मंत्र तुम्हांला लागू होत नाहीत. तुम्ही क्षत्रिय कुलवतंस आहात आपल्याला वेदोक्तमंत्र लागू होतात पुराणोक्त नाही. संतप्त झालेल्या छत्रपती शाहू महाराजांनी वेदोक्त पद्धतीने तुम्हाला मंत्र म्हणावे लागतील अस म्हटलं. नारायण भट यांनी नकार दिला. पुढे हे प्रकरण पुण्याला गेलं. पुण्यालाही वेदोक्त पद्धतीने करता येणार नाही असा निर्णय झाला आणि शेवटी हे प्रकरण तेव्हाचे व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या दरबारात गेलं. लॉर्ड कर्झन यांच्यासमोर अनेक जणांनी वाद-विवाद केले. खुद्ध छत्रपती शाहू महाराजांनीही वाद-विवाद केले आणि त्यामध्ये ठरलं वेदोक्त हे क्षत्रिय राजांना लागू होणार. उर्वरीत क्षत्रिय समाजाबद्दल काय निर्णय झाला याबाबतचे दाखले सापडत नाहीत. याचा अर्थ त्यांचे म्हणणे स्पष्ट होते की, या युगामध्ये दोनच वर्ण आहेत. एक सनातन मनुवादी आणि बाकी सगळे शूद्र. सयाजीराव गायकवाड यांच्याबरोबर देखिल हेच झालं आणि परवा कोल्हापूरच्या राणी संयोगिताराजे यांच्याबरोबर देखील हेच झाले आहे.

Trupti Desai यांची इंदुरीकर महाराजांवर टीका : पैसे कमवण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच दिलाय का? – Letsupp

प्रश्न एवढाच आहे की, वेदोक्त आणि पुराणोक्त हे दोन मंत्र समाजाच्या वर्ण व्यवस्थेला मजबूत करतात. वर्णाश्रमामध्ये उच्च वर्णीयांसाठी एक मंत्र आणि खालच्या वर्णीयांसाठी एक मंत्र हे अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात चालू आहे आणि त्याचे फटके अनेकांना बसले आहेत.

मग, हे दोन मंत्र कशाला ? एकच मंत्र असायला हवा. जर आपण म्हणतो की, हिंदू धर्मामध्ये सगळे समान आहेत तर मंत्र दोन कशाला ? जो मंत्र ज्या समुदायाला लागू होतो तो सगळ्या समुदायाला लागू करा. कारण, पुस्तकांमध्ये स्पष्ट दिले आहे की, वेदोक्त एका समाजाला आणि पुराणोक्त बहुसंख्यांक समाजाला. असं कशासाठी ? आपल्याला समाजसुधारणाच हवी असेल तर मग एकच मंत्र सगळ्यांना लागू करा आणि जी काही पूजा अर्चा करायची आहे ती वेदोक्त मंत्रानेच होऊ द्या. मग त्याच्यामध्ये मुंज आडवी येऊ देऊ नका, त्यामध्ये काही चालीरीती आडव्या येऊ देऊ नका तसेच त्याच्यातील वर्णव्यवस्थेमधील वर्ण आडवा येऊ देऊ नका.

वर्णाश्रमाची प्रथा बंद करायची असेल आणि देशामध्ये एकोपा ठेवायचा असेल; तर इथला बारा बलुतेदार असो, इथला अतिशूद्र असो, इथला मराठा असो, इथला समस्त बहुजन असो. त्या सगळ्यांना वेदोक्त मंत्राचे अधिकार देऊन टाकावेत आणि पुराणोक्त बाजूला काढून, जसं कायद्यासमोर सगळे समान आहेत, जसे धर्मासमोर सगळे समान आहेत अशी एक दिशा ब्रह्मवृंदांनी द्यावी आणि त्या प्रकारचा ठराव धर्म संस्थेमध्ये पारित करुन घ्यावा. साधारण लोकांना हे कळतच नाही की, वेदोक्त आणि पुराणोक्त म्हणजे काय ? पण, त्या साधारण लोकांना हे माहीत नाही की, पूर्वीच्या काळी वेद वाचायची देखिल संधी सर्वसामान्यांना नव्हती तसा कायदा होता आणि तो कायदा आजही मनुस्मृतीत आहेत.

(7) Omraje Nimbalkar & Kailas Patil : खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची ‘बदले की आग’ | – YouTube

मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे वेद वाचता येत नव्हते. वेद पाठांतर करता येत नव्हते. किंबहुना संस्कृत शिकता येतं नव्हतं आणि शिकलं तरी मोठी शिक्षा त्या शिकणाऱ्याला देण्याचे अधिकार ज्यांना संस्कृत शिकण्याचे अधिकार आहे त्यांच्या हातात होते. त्यामुळे ही परंपरा पुढे चालू ठेवायची का ? हा प्रश्न आहे. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर सरळ आहे की, वेदोक्त आणि पुराणोक्त हे बाजूला काढा आणि सर्व समाजाला आता वेदोक्त मंत्रानेच पूजा करण्याचा अधिकार द्या. असा ठराव सगळ्यांनी केला पाहिजे. अशी सगळ्यांनी मागणी केली पाहीजे आणि ब्रह्मवृंदांनी ती स्वीकारली पाहिजे. भेदभाव नष्ट करा आणि एक समाजमन असू द्या. सगळ्यांचा धर्म जर एक आहे तर मग, मंत्र दोन कशाला हवे आहेत ? दुर्दैव हे की धर्मांध झालेल्या या लोकांमधल्या काही जाणंना कळतच नाही की, आपण कोण आहोत आपण वर्णव्यवस्थेमध्ये कुठे आहोत, आपला धर्म एक आहे तर मग आपल्याला वेदोक्त मंत्र का लागू नाही.

इथल्या मराठा व इतर मागासवर्गींयांनी याचा आभ्यास करावा मी म्हणत नाही. पण सनातनी मनुवादी तुम्हाला शूद्र समजतात आणि तुम्हाला घेऊन धर्माच्या नावाने राजकारण करतात. श्रुती-स्मृती पुराणोक्त… आठवले का ?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube