मुंबई : पुण्यातील स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरूणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) अॅक्शन मोडवर आले असून, मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत सरनाईक यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून परिवहन विभागात आयपीएस अधिकारी असावा याबाबत बैठकीत चर्चा झाली. (Transport Minister Pratap Sarnaik On Swargate Bus Depo Rape Case)
Swargate Rape : निवडणुकीतील उमेदवार ते अजितदादांच्या आमदारासोबत फोटो; गाडेची कुंडली कशी?
सरनाईक यांचे आदेश काय?
स्वारगेट येथील घटनेनंतर प्रता सरनाईक यांनी सर्व एसटी बसेसमध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 15 एप्रिलपर्यंत भंगारतील बसेस हटवण्यात येणार असून, सुरक्षारक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले आहे. तसेच महामंडळाच्या बसेसमध्ये सीसीटीव्हीसह जीपीएस बंधनकारक असेल. शिवाय सर्व बसेस आणि एसटी आगारात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले आहे. इतर राज्यात महामंडळात आयपीएस अधिकारी आहेत. आपल्याकडे पण तरतूद आहे, ती नेमणूक करावी अशी मागणी गृह खात्याला करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
स्वारगेट बस स्थानकात पहाटे 5.30 वाजता नेमकं काय घडलं ?
पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या (Phaltan) दिशेने निघाली होती. बससाठी ती स्वारगेट बस स्थानकात थांबली असता आरोपी दत्तात्रय गाडे तिकडे आला आणि पीडित तरुणीला स्वारगेट आगारात मधोमध उभी असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं. उभी असणारी बस सोलापुरला जाणार आहे आणि मधे बस फलटणला थांबणार आहे. असं त्याने पिडितेला सांगितले. यावेळी तो पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बस बंद केली.
त्यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तिकडून पळ काढला. तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. सध्या या प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची विविध पथकं त्याचा शोध घेत आहे.
स्वारगेट प्रकरण, आरोपी दत्तात्रय गाडेचा तरुणीवर दोनदा अत्याचार, मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
एसटीमध्ये दारुच्या बाटल्या आणि कंडोमचा खच
या घटनेनंतर संताप व्यक्त करत शिवसेना नेते (ठाकरे गट) वसंत मोरे (Vasant More) यांनी सुरक्षारक्षाकांच्या केबिनची तोडफोड केली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना, वसंत मोरे म्हणाले की, स्वारगेट एसटी स्थानकामध्ये 20 सुरक्षा कर्मचारी आहेत मात्र हे 20 सुरक्षा कर्मचारी असताना देखील सुरक्षा केबिनच्या समोर उभ्या असलेल्या एसटीमध्ये बलात्कार होत असेल तर या सुरक्षा व्यवस्थेचा उपयोग काय? त्यामुळे आम्ही ही सुरक्षा केबिन फोडली असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
‘उज्वल निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे यांची केस लढली होती अन्…’, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
तसेच स्वारगेट एसटी आगाराच्या कडेला बंद असलेल्या एसटीमध्ये दारुच्या बाटल्या आणि कंडोमचा खच पडलेला आहे. सर्व गोष्टींना येथील प्रशासन व्यवस्था आणि सुरक्षा रक्षक जबाबदार आहे. त्यामुळे कठोरातील कठोर कारवाई या सर्वांवर झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.