स्वारगेट बस प्रकरण, परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई, डेपोतील 23 सुरक्षारक्षक सस्पेंड

  • Written By: Published:
स्वारगेट बस प्रकरण, परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई, डेपोतील 23 सुरक्षारक्षक सस्पेंड

Swargate Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. पहाटे 5.30 वाजता स्वारगेट बस स्थानकावर (Swargate Crime News) ही संतापजनक घटना घडली. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली असून आरोपी विरोधात कठोर करवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. तसेच डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करुन एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. 23 सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन करून उद्यापासून त्यांच्या जागी स्वारगेट डेपोमध्ये (Swargate Depot) नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)  यांनी दिले आहे. याचबरोबर स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. तसेत या चौकशीनंतर एका आठवड्यात अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर कारवाईचा निर्णय होणार आहे.

प्रकरण काय?

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटे 5.30 वाजता स्वारगेट बस स्थानकावर ही संतापजनक घटना घडली. पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. बससाठी ती स्वारगेट बस स्थानकात थांबली असता आरोपी दत्तात्रय गाडे तिकडे आला आणि पीडित तरुणीला स्वारगेट आगारात मधोमध उभी असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं. उभी असणारी बस सोलापुरला जाणार आहे आणि मधे बस फलटणला थांबणार आहे. असं त्याने पिडितेला सांगितले. यावेळी तो पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बस बंद केली. त्यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तिकडून पळ काढला.

स्वारगेट बस स्थानकातील घटना संतापदायक, आरोपीला तात्काळ अटक करा; अजित पवार ॲक्शन मोडमध्ये

तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. सध्या या प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची विविध पथकं त्याचा शोध घेत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube