गोड बोलला, जीवे मारण्याची धमकी अन्…, स्वारगेट बस स्थानकात पहाटे 5.30 वाजता नेमकं काय घडलं ?

Pune Swargate ST Case : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून (Pune) धक्कादायक घटना समोर येत आहे. पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यातच पुण्यातून आज सकाळी एक संतापजनक घटना समोर आली आहे. ज्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात (Swargate Bus Station) एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटे 5.30 वाजता स्वारगेट बस स्थानकावर ही संतापजनक घटना घडली.
माहितीनुसार, पीडित तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती. या प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. नरधाम आरोपी दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार असून सध्या तो जामिनावर बाहेर आहे. ही घटना घडण्यापुर्वी आरोपी दत्तात्रय गाडे याने पीडित तरूणीशी चर्चा केली आणि तिला चुकीच्या बसमध्ये जाण्याचा सल्ला दिला. आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो देखील समोर आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा शोध सुरु केला आहे.
पहाटे 5.30 वाजता नेमकं काय घडलं ?
पीडित तरुणी पुण्यातून फलटणच्या (Phaltan) दिशेने निघाली होती. बससाठी ती स्वारगेट बस स्थानकात थांबली असता आरोपी दत्तात्रय गाडे तिकडे आला आणि पीडित तरुणीला स्वारगेट आगारात मधोमध उभी असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं. उभी असणारी बस सोलापुरला जाणार आहे आणि मधे बस फलटणला थांबणार आहे. असं त्याने पिडितेला सांगितले. यावेळी तो पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बस बंद केली.
त्यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तिकडून पळ काढला. तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. सध्या या प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांची विविध पथकं त्याचा शोध घेत आहे.
एसटीमध्ये दारुच्या बाटल्या आणि कंडोमचा खच
या घटनेनंतर संताप व्यक्त करत शिवसेना नेते (ठाकरे गट) वसंत मोरे (Vasant More) यांनी सुरक्षारक्षाकांच्या केबिनची तोडफोड केली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना, वसंत मोरे म्हणाले की, स्वारगेट एसटी स्थानकामध्ये 20 सुरक्षा कर्मचारी आहेत मात्र हे 20 सुरक्षा कर्मचारी असताना देखील सुरक्षा केबिनच्या समोर उभ्या असलेल्या एसटीमध्ये बलात्कार होत असेल तर या सुरक्षा व्यवस्थेचा उपयोग काय? त्यामुळे आम्ही ही सुरक्षा केबिन फोडली असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
‘उज्वल निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे यांची केस लढली होती अन्…’, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
तसेच स्वारगेट एसटी आगाराच्या कडेला बंद असलेल्या एसटीमध्ये दारुच्या बाटल्या आणि कंडोमचा खच पडलेला आहे. सर्व गोष्टींना येथील प्रशासन व्यवस्था आणि सुरक्षा रक्षक जबाबदार आहे. त्यामुळे कठोरातील कठोर कारवाई या सर्वांवर झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.