Download App

तृतीपंथीयांच्या आंदोलनावर सुषमा अंधारे कडाडल्या! म्हणाल्या, मुजोरांच्या…

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, सत्ता मुजोरांच्या हाती, या शब्दांत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे तृतीपंथीयांच्या आंदोलनावर कडाडल्या आहेत. दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या तृतीयपंथीयांविषयी केलेल्या विधानानंतर पुण्यात तृतीयपंथीयांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून पुण्यात तृतीयपंथीयांनी आंदोलन छेडलं असून नितेश राणेंनी तृतीयपंथीयांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान, पोलिस आणि तृतीयपंथीयांमध्ये चकमक झाल्याचं दिसून आलं आहे. त्यावरुन सुषमा अंधारेंनी सत्ताधाऱ्यांवर रोख धरला आहे.

Maharashtra Politics : ‘ते यारो का यार आहेत’; दिग्गज मराठी अभिनेत्याकडून राज ठाकरेंचे तोंड भरून कौतुक

सुषमा अंधारे म्हणाल्या, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोणावर गुन्हा दाखल करायचा अन् कोणावर नाही याचे त्यांनी ठोकताळे ठरवून घेतले आहेत. विरोधकांमधला कोणी असेल तर त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करातात, पण जिथे खरा गुन्हा घडला आहे, तिथं आम्ही तपासून गुन्हा दाखल करु, असा पवित्रा पोलिसांकडून घेतला जात आहे, गृहमंत्र्यांची ताकद, कुवत विरोधकांना नामोहरम करण्यासाठी आहे ती ताकद गोरगरिबांना न्याय देण्यासाठी नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Shah Rukh Khan: हेमा मालिनीच्या गुरु माँ यांनी केली होती किंग खानची भविष्यवाणी; म्हणाली…

तसेच निलेश राणे, नितेश राणे आपल्या संस्कारांचा परिचय देताहेत, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. वारंवार तृतीयपंथीयांना टार्गेट करणे त्यांच्यावर अभद्र आक्षेपार्ह टीप्पण्णी करणं हे निंदनीय, अशोभनीय, असंस्कृतपणाचं लक्षण आहे. पुणे पोलिसांनी तृतीयपंथीयांवर लाठीहल्ला केला, ओढत नेलं, माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी ही दृश्य टीपली आहेत, यावर आम्ही काहीच केलं नाही असं गृहमंत्री म्हणत असतील तर ही सरळसरळ धूळफेक असून आम्ही त्याचा निषेध करत आहोत, नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

ZP शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात; राज्य सरकारचा मोठा निर्णय

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपचे आमदार नितेश राणे ‘हिजडा’ शब्दांचा उल्लेख केला होता. त्यावरुन तृतीयपंथीय समूहाचा अवमान केल्याचा आरोप करत तृतीयपंथीयांनी नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Stree 2 Teaser: ती पुन्हा येतेय! चंदेरीत ‘स्त्री 2’ ची पुन्हा दहशत पसरणार, पाहा Video 

न्याय मागणं देवेंद्रजींच्या काळात गुन्हा :
आम्हाला न्याय द्या, अशी मागणी करणं सुद्धा देवेंद्रजींच्या काळात गुन्हा आहे. तर दुसरीकडे फडणवीसांच्या पत्नी कुविख्यात बुकीसोबत वावरतात तेव्हा त्यांच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल होतात. त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी गुजरातपर्यंत पोलिस पाठवले जातात, पण इथे माणसं अन्नपाण्याशिवाय रात्रीपासून थांबतात न्याय मागतात, त्यांना पोलिस न्याय देत नाही. यावरुन त्यांच्यावर किती दबाव आहे हे दिसून येतं असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, कोणावर गुन्हा दाखल करायचा अन् कोणावर नाही त्याचे ठोकताळे ठरलेले आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करु पण जो खरंच न्याय मागत असेल त्याला आम्ही न्याय देणार नाही, कारण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही सत्ता ही मुजोरांच्या हाती असल्याचं अंधारेंनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us