Maharashtra Politics : ‘ते यारो का यार आहेत’; दिग्गज मराठी अभिनेत्याकडून राज ठाकरेंचे तोंड भरून कौतुक

Maharashtra Politics : ‘ते यारो का यार आहेत’; दिग्गज मराठी अभिनेत्याकडून राज ठाकरेंचे तोंड भरून कौतुक

Atul Parchure: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ( MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे कलासक्त नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक कलाकारांना सरळ हाताने मदत केल्याचे अनेक कलाकार सांगत असतात. सिनेमानं प्राईम टाइम (Prime time) मिळवून देण्यापासून ते कलाकारांचा उचित गौरव करण्यापर्यंत राज ठाकरे हे कायमच मराठी सिनेमासृष्टीला (Marathi cinema)  मदत केली आहे. राज्यात सिनेमा सेनेअंतर्गत त्यांनी मराठी सिनेमासृष्टीतील अनेक समस्यांवर अनेकदा तोडगा काढला आहे.

यामुळे मराठी कलाकारांचे त्यांच्याबरोबर चांगलीच मैत्री आहे. अनेक बरेच मराठी कलाकार त्यांच्याबद्दल बोलताना भरून येताना आपण पाहिलं असेल. तसेच ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांनी देखील राज ठाकरेबद्दल तोंड भरून कौतुक केल्याचे यावेळी दिसून आले आहे. ‘ते यारो का यार आहेत’, असं अतुल परचुरे यावेळी म्हणाला आहे. सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये अतुल परचुरे बोलत होते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना (Shiv Sena) फुटल्यानंतर आता राष्ट्रवादी (NCP) देखील फुटली आहे. विरोधी बाकावर बसलेल्या अजित पवारांनी त्याच सरकारमध्ये आता सत्तेत सहभाग घेतल्याचे राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या समर्थकांनी अनेकदा साद घातल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच राज ठाकरे हा खूपच वेगळा माणूस आहे, राज ठाकरेंना एकदा तरी संधी देऊन पाहा, अशी मागणी केली जात असते. हाच सवाल पॉडकास्टमध्ये अतुल परचुरे यांना विचारण्यात आला होता.

‘राज ठाकरे नेमका कसा माणूस आहे? राज ठाकरे काही बदलू शकणार का?’ असा सवाल विचारला असता, अतुल परचुरे यांनी राज ठाकरेंच्या समर्थनार्थ भूमिकेवर भाष्य केले आहे. अतुल परचुरे म्हणाले की, “राज ठाकरे यांच्यामध्ये बदल घडवण्याची खूप इच्छा आहे, हे मी नक्की सांगू शकतो. त्यांना मनापासून वाटतं की जे काही चाललंय ते बदललं पाहिजे. हे मी मनापासून आणि खात्रीशीर सांगू शकतो. कारण आमच्यामध्ये खूप जुनी ओळख आहे. मी त्यांना शाळेत असल्यापासून ओळखतो. ते माझ्यापेक्षा १ वर्षांनी लहान आहेत. तेव्हा मी बालनाट्यामध्ये काम करत होतो. मी फेमस होतो. कॉलेजमध्ये आल्यावर आमची नेहमी भेट देखील होत असायची.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

राज ठाकरेंकडे व्हिजन आहे. त्यांना मनापासून बदल घडवण्याची इच्छा आहे. ते खूप चांगले आहेत. ते ‘यारो का यार’ आहेत. इतक्या सरळ हाताने आपल्या आजूबाजूच्या माणसांना देणारा माणूसच नाही. हे मी मनापासून सांगत असल्याचे यावेळी त्यांने स्पष्ट केले आहे. कारण मी खूप तास त्यांच्याबरोबर घालवले आहेत, असंही अतुल परचुरे यावेळी म्हणाला आहे.सध्या जी काही राजकीय उलथापालथ सुरू आहे, त्यामध्ये राज ठाकरेसारखा माणूस असायला हवा असं वाटतं का? असा प्रश्न विचारल्यावर अतुल परचुरे म्हणाले की, “त्यांना ताकद दिली पाहिजे. आता ते एकटे आहेत. शेवटी तुमच्याकडे ताकद कधी येते जेव्हा तुमचे उमेदवार निवडून येतात, तुमचे आमदार खासदार असतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube