Shah Rukh Khan: हेमा मालिनीच्या गुरु माँ यांनी केली होती किंग खानची भविष्यवाणी; म्हणाली…

Shah Rukh Khan: हेमा मालिनीच्या गुरु माँ यांनी केली होती किंग खानची भविष्यवाणी; म्हणाली…

Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच बॉलीवूडचा (Bollywood) लाडका सुपस्टार किंग खान म्हणून ओळखला जात असतो. किंग खानने ८० च्या दशकात टीव्ही सिरियलमधून अभिनयाला सुरुवात केली होती. हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या ‘दिल आशना है’ (Dil Aashna Hai) या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदापर्ण केले होते. परंतु पुढे जाऊन किंग खान (King Khan) हा सुपस्टार बनेल अशी कल्पना देखील कुणी केली नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)


हेमा मालिनी यांच्या गुरु माँ यांनी किंग खानबद्दल एक भाष्य केले होते, अखेर आता ते खरे ठरल्याचे हेमा मालिनी यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. १९९२ साली किंग खानचे ४ सिनेमे प्रदर्शित करण्यात आले होते. यापैकी एक ‘दिल आशना है’ पहिला सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका हेमा मालिनी होते. किंग खानचा हा पहिला सिनेमा होता. एका मुलाखतीच्या दरम्यान हेमा मालिनी यांनी यावर भाष्य केले आहे की, जेव्हा त्यांनी किंग खानाला सिनेमासाठी साइन केले होते.

त्यावेळेस देखील त्यांच्या गुरु माँ यांनी किंग खानाला सुपस्टार बनेल, अशी भविष्यवाणी सांगितली होती. आता यावर हेमा मालिनी याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. हेमा म्हणाल्या की, मी किंग खानाला फौजी सीरियलमध्ये पाहिले होते. त्यामध्ये तो खूपच गोड दिसून आला होता. त्याकाळामध्ये माझ्या ‘दिल आशना है’ या सिनेमाचे लेखन देखील सुरु होते. या सिनेमासाठी मला नवीन चेहऱ्याची गरज भासत होती. जेव्हा मी किंग खानाला बघितलं, तेव्हा हा चांगला दिसत आहे आणि याला आपण आपल्या सिनेमात घ्यायला हवं.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, मी ‘दिल आशना है’ हा सिनेमा बनवत होते. याची कल्पना मी गुरु माँ यांना दिली होती. परंतु त्यांनी मला सांगितले होते की, तुला खूप मोठा हिरो मिळणार  आहे. पण मला ही गोष्ट त्यावेळेस आजिबात लक्षात आली नव्हती. परंतु गुरु माँ यांना पुढे काय घडणार आहे हे त्यांना नक्कीच कळले होते. आणि तसचं घडलं, किंग खान आता मोठा सुपस्टार बनला आहे. गुरु मां यांनी मला करिअरमध्ये देखील खूप मदत केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन हेमा मालिनी यांनी बागवानवर सही केली होती. विवाहित असून देखील त्यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा सल्ला दिल्याचे यावेळी तिने सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube