राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला राष्ट्रवादीत काँग्रेसचेनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं. अजित पवार यांनी (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. राज्यातच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले. यामुळे आता राज्यात दोन उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे ग्रामपंचायतीला देखील दोन उपसरपंचाची मागणी होऊ लागली आहे. (The state needs two deputy chief ministers and the village also needs two deputy sarpanchs)
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील तळेगाव ग्रामपंचायत सदस्य अनिल भुजबळ यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे ग्रामपंचायतीला देखील दोन उपसरपंच असावेत अशी मागणी केली आहे. जर दोन उपसरपंच गावाला मिळाले तर गावचा विकास होईल असे भुजबळ म्हणतात. गावची लोकसंख्या देखील वाढत आहे तसेच काही ठिकाणी दोन – तीन – चार गाव मिळून एक ग्रामपंचायत असते.
NCP Crisis : सुभेदार होण्यापेक्षा राजा होणं चांगलं, जितेंद्र आव्हाडांचा दादांना टोला…
त्यामुळे एकट्या सरपंचाला एवढा कारभार हाकणं कठीण होत. तसेच सरपंच पद हे राखीव असल्याने नाराजीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गटातटात वाद होतात. हे सर्व थांबवण्यासाठी तसेच गावचा विकास करण्यासाठी राज्याच्या धर्तीवर गावाला देखील दोन सरपंच मिळावे अशी मागणी तळेगाव ग्रांमपंचायतीचे सदस्य अनिल भूजबळ यांनी केली आहे.
तळेगाव ग्रांमपंचातीचे सर्व सदस्य तसेच गावातील लोकांनी विचार विनिमय करून पुणे जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन गावाला दोन उपसरपंच असावेत अशी मागणी केली आहे.