NCP Crisis : सुभेदार होण्यापेक्षा राजा होणं चांगलं, जितेंद्र आव्हाडांचा दादांना टोला…
NCP Crisis : मोठ्या राज्याचा सुभेदार होण्यापेक्षा लहान राज्याचा राजा होणं खूप चांगलं असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला आहे. दरम्यान, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पाडून आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवारा गटामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांना टोलेबाजी केलीयं. त्यावरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत घमासान सुरु होणार असल्याची शक्यता आहे.
IND vs WI: नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने घेतला फलंदाजी निर्णय, यशस्वी-ईशानचे पदार्पण
पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज छोट्या साम्राज्याचे राजे होते. शिवरायांना दिल्लीत 5 हजारांची मनसबदारी दिली, तेव्हा ते ती मनसबदारी लाथाडून महाराष्ट्रात परत निघून आले होते. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. हीच महाराष्ट्राची भूमिका असल्याचं म्हणत त्यांनी शिवरायांचं उदाहरण देत अजितदादांना उद्देशून म्हणाले आहेत. तसेच एक माणूस जो इथं राजा म्हणून राहत होता, तोच माणून आता दिल्लीला सुभेदार बनायला चालला आहे. मोठ्या राज्यात सुभेदार होण्यापेक्षा लहान राज्याचा राजा होणं खूप चांगलं आहे, असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या तरुणांविषयी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, सोशल मीडियावर तरुणांना घाबरवलं जातंय, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यांना उचलून नेलं जात आहे. हे तरुण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून व्यक्त होतात. ते कुणाला आई-बहिणीवरून शिव्या देत नसल्याचंही ते म्हणाले आहेत. आपले विचार स्वतंत्रपणे मांडणे हा या देशातील लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुलभूत अधिकारांमध्ये हा अधिकार दिला आहे. हा मुलभूत अधिकार हिरावून घेणे, त्यांचा आवाज दाबणे बरोबर नाही. सरकार हे जास्त दिवस असं करू शकणार नाही,” असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.
राज्यात आता महाविकास आघाडीतील दोन मोठ्या पक्षात फुट पडल्याने काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद असणार असल्याचा दावाही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आल आहे. त्यावरही जितेंद्र आव्हाडांनी सूचक वक्तव्य केलं आहे. काँग्रेसचे आमदार जास्त आहेत हे कशावरून? आमचे 45 आमदार तर आमच्याकडेच आहेत. विरोधी पक्षनेतेपदाच्या पत्रावर सही करा, असं पत्रच आम्ही पाठवणार असल्याचं ते म्हणाले आहेत.