शिंदे गटाचे आता लवकरच विसर्जन होईल ; ठाकरे गटाने डिवचले !

Vinayak Raut On Eknath Shinde : राज्यातील सत्तेमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे गटाचे नेते तुटून पडले आहेत. खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटावर आक्रमकपणे बोलत आहेत. आता विनायक राऊत यांनी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदारांना डिवचले आहे. भाजपकडून शिंदे […]

FIR Against Ex MD Of BharatPe, Family For Allegedly Defrauding The Fintech Of ₹81 Crore (4)

eknath shinde

Vinayak Raut On Eknath Shinde : राज्यातील सत्तेमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे गटाचे नेते तुटून पडले आहेत. खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटावर आक्रमकपणे बोलत आहेत. आता विनायक राऊत यांनी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदारांना डिवचले आहे. भाजपकडून शिंदे गटाच्या विसर्जनाची सुरुवात झाली असल्याचे विधान विनायक राऊत यांनी केले आहे.(udhav thackeray group mp vinayak raut on eknath shinde group)

भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेणं हे दुर्दैवच, अजितदादांवरून अण्णांचा भाजपवर निशाणा 

विनायक राऊत हे पुण्यात आले होते. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी जिंकणार आहे. ते कितीही एकत्र आले, कितीही गळाभेटी घेत्या तरी महाविकास आघाडी जिंकणार आहे. उद्धव ठाकरे व शरद पवार या दोन नेत्यांमध्ये महाविकास आघाडी जिंकण्याची ताकद असल्याचे राऊत यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे गटाचा थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच मोठा आरोप; अधिवेशन पुन्हा तापणार?

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरही विनायक राऊत यांनी मोठे भाष्य केले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. काही आमदारांची पोपटपंची सुरू आहे. तरीही मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. मंत्रिपद मिळणार नाही उलट भाजपकडून एकनाथ शिंदेंची आणि त्यांच्या गटाच्या विसर्जनाची सुरुवात झाली असल्याचे राऊत म्हणाले.

kirit Somaiya Video : ‘त्या’ ताईने पुढे यावं, चित्रा वाघ यांचं खुलं आव्हान…

शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना संपर्क केला का याबाबत ते म्हणाले, शिंदे गटाच्या आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला असला तरी आम्ही त्यांच्यासाठी अजून दरवाजे उघडलेले नाहीत. ते गद्दारी करून तिकडे गेलेत, त्यांची गद्दारी त्यांना लखलाभ होऊ द्या, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version