Download App

पुण्यात GBS चा धोका; पाण्याची पाहणी न करता माघारी फिरणाऱ्या पथकाला गावकऱ्यांचा घेराव अन्…

Union Health Ministry team in Pune : पुण्यात (Pune) जीबीएस म्हणजेच गिलियन बॅरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय. ‘जीबीएस’ संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल (Pune News) झालं. परंतु पाण्याची तपासणी न करता माघारी फिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

पुण्यात जीबीएसचा (Guillain Barre Syndrome) प्रादुर्भाव वाढतोय. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक (Union Health Ministry team) पुण्यात दाखल झालं होतं. परंतु, विहिरीची पाहणी न करताच पथक माघारी निघाल्याने नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. विहिरीतील पाण्याची पाहणी करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली होती. या पथकाची गाडीच नागरिकांनी अडवली. त्यानंतर आरोग्य पथकाने पाण्याची पाहणी केल्याचं समोर आलंय.

Video : वारंवार बोलणं झालं, तक्रारी झाल्या पण, मराठी अभिनेत्याचं फडणवीसांना खास पत्र

पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग जलजन्य आजार टाळण्यासाठी नियमावली जारी केलीय.ॉसुरक्षित पिण्याच्या पाण्याची खात्री करा. पिण्यापूर्वी पाणी गाळून, विस मिनिटे उकळून आणि नंतर थंड करून प्या. भाज्या आणि फळे चांगले धुवा. घरचे ताजे आणि स्वच्छ शिजवलेले अन्न पदार्थ खा. तसेच शक्यतो बाहेरील अस्वच्छ आणि उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे टाळा. पोल्ट्री आणि मांस योग्य प्रकारे शिजवा.

कच्चे किंवा कमी शिजलेले अन्न, विशेषतः अंडी आणि सी-फूड (मांसाहारी पदार्थ) कच्चे खाणे टाळा. वैयक्तिक स्वच्छता राखा. उद्रेकादरम्यान भांडी किंवा अन्न सामायिक करणे टाळा. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगळे ठेवा. कच्चे मांस हाताळल्यानंतर स्वयंपाकघरातील पृष्ठभाग आणि भांडी निर्जंतुक करा. जेवण्यापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा. • अन्न पदार्थ हाताळताना प्रत्येक वेळी हात साबणाने स्वच्छ धुवा, असं महानगरपालिकेनं नागरिकांना सांगितलं आहे.

प्रचंड गर्दी… महाकुंभात चेंगराचेंगरी कशी झाली? CM योगींनी थेट सांगितलं…

मांसपेशीमध्ये कमकुवतपणा आणि स्नायूंची हालचाल मंदावणे. हात आणि पायांमध्ये हळूहळू वाढणारा, कमकुवतपणा. अलीकडे उद्भभवलेला हात किंवा पायांमध्ये सुन्नपणा किंवा झिणझिण्या. गुडघ्याच्या किंवा हाताच्या स्नायूंमधील हालचाल मंदावणे, अशी लक्षणे आढळल्यास दवाखान्याशी संपर्क साधावा असं आवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय.

 

follow us