Download App

लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर ‘संचारबंदी’, अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा

Lonavala Bhushi Dam : लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये (Bhushi Dam) नुकतंच 6 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी

Lonavala Bhushi Dam : लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये (Bhushi Dam) नुकतंच 5 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी (Pune Collector Suhas Diwas) मोठा निर्णय घेत लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांसाठी संचारबंदी लागू करण्याचा आदेश दिला.

30  जून रोजी  भुशी डॅममध्ये अन्सारी कुटुंबाचे 5 जण वाहून गेल्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतर भुशी डॅमवर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात येत होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी  लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांसाठी संचारबंदी लागू केली आहे तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे दिवसेंनी जाहीर केले आहे. याच बरोबर येत्या काही तासात लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर होणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी दिवसेंनी दिली.

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता लोणावळ्यात हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात येणार आहे.  जेव्हा सार्वजनिक सुट्या असतात आणि विकेंडला लोणावळ्यातील भुशी डॅमवर अनेक तरुण येतात आणि रात्री गोंधळ घालतात तसेच हुल्लडबाजी करतात अशा अनेक तक्ररी येत आहे. त्यामुळे आता लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसेच संबंधित अधिकाऱ्याने कारवाई करण्यात दिरंगाई केली तर अधिकाऱ्यावर कारवाई होणार असं देखील जिल्हाधिकारी सुहास दिवसे म्हणाले.  याच बरोबर आता लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.

विकेंड आणि सार्वजनिक सुट्याच्या दिवशी लोणावळा आणि खंडाळा येथील विविध पॉईंटवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र आता सर्व  पर्यटकांना जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. जर असं झाले नाहीतर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. अशी देखील माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी दिली आहे.

‘स्वतःला हिंदू म्हणणारे …,’ राहुल गांधींचं हिंदू धर्मावर वादग्रस्त विधान, मोदीही नाराज

follow us

वेब स्टोरीज