Download App

Vidhansabha Election : लोहगावचा पाणी प्रश्न सोडवण्यास प्राधान्य; बापूसाहेब पठारे यांचा निर्धार

लोहगावच्या पाणी समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करणे हे माझे वचन आहे. या प्रश्नासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात येणार.

  • Written By: Last Updated:

पुणे : वडगावशेरी मतदारसंघातून (Vadgaonsheri Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून निवडणूक लढवणारे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे  (Bapusaheb Pathare) यांनी आपल्या प्रचारात जोरदार गती दिली आहे. ​खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या ८ नोव्हेंबरच्या सभेपाठोपाठ दि. ९ नोव्हेंबर रोजी लोहगाव परिसरात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत प्रचार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.​ पदयात्रेच्या शेवटी जाहीर सभा होणार आहे.

‘माझ्या विरोधात भाजप उमेदवार कॉन्ट्रॅक्टर’, यशोमती ठाकूर यांचा दावा, नवनीत राणांचाही घेतला समाचार 

लोहगाव बस स्टॉपपासून सुरु होणा​ऱ्या पदया​त्रेची ​सांगता रात्री साडे आठ वाजता संत तुकाराम मंदिर(लोहगाव) येथे होणार आहे. भक्ती शक्ती चौक – खेसे आळी -जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर – मोझे आळी – चिरके कॉलनी – उत्तरेश्वर नगर – स्वामी समर्थ नगर – शिव कॉलनी -धानोरी रोड – साठे वस्ती – उत्तरेश्वर मंदिर-भक्ती शक्ती चौक – आझाद चौक – शिळा मंदीर ​-​ संत तुकाराम महाराज मंदिर​ असा या पदयात्रेचा मार्ग असणार आहे. पदयात्रेच्या शेवटी ​रात्री साडे आठ वाजता संत तुकाराम महाराज मंदिर​ जवळ सभा होणार आहे.

शिवाजीराव कर्डिलेंच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी गर्दीच गर्दी, पंकजा मुंडेंनी सभा गाजवली 

परिसरातील नागरिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार यांचा सहभाग ​राहणार आहे. ​लोहगावच्या प्रमुख भागांतून जाणाऱ्या या पदयात्रेचा हेतू नागरिकांना त्यांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी देण्याचा आहे.

लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी परिसर हा आधुनिक​ पुणे होणार : बापूसाहेब पठारे 
बापूसाहेब पठारे म्हणाले, “लोहगावच्या पाणी समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करणे हे माझे वचन आहे. या प्रश्नासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात येणार असून, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन हा प्रश्न निश्चित सोडवला जाईल. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी प्राधान्य दिले जाईल, तसेच रस्त्यांची गुणवत्ता सुधारली जाईल, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल.”

​लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी परिसर हा आधुनिक पुणे म्हणून ओळखला जाईल, यासाठी व्हिजन आखले जाणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करून टँकर वरील अवलंबित्व कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी उच्च क्षमतेच्या जल वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. डीपी रस्त्याच्या निर्मितीमुळे वाहतूक सुरळीत करण्यास मदत होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. अंधारमय रस्त्यांना पथ दिवे बसवले जाणार आहेत. अतिक्रमणे कमी करून सुरळीत वाहतुकीला प्राधान्य दिले जाणार आहे,असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बापूसाहेब पठारे आणि त्यांच्या समर्थकांनी लोहगाव परिसरातील पायाभूत विकास आणि सुविधा सुधारण्याचे वचन दिले असून, स्थानिक पाणीपुरवठा आणि रस्ते सुधारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

आमदार रोहित पवार यांच्या प्रचार पदयात्रेची माहिती:
ठिकाण : लोहगाव बस स्टॉप, तसेच परिसर
वेळ ​:​ सायंकाळी ४ ते रात्री साडे आठ
सहभाग: आमदार रोहित पवार, बापूसाहेब पठारे, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, मतदार

follow us