‘माझ्या विरोधात भाजप उमेदवार कॉन्ट्रॅक्टर’, यशोमती ठाकूर यांचा दावा, नवनीत राणांचाही घेतला समाचार

  • Written By: Published:
‘माझ्या विरोधात भाजप उमेदवार कॉन्ट्रॅक्टर’, यशोमती ठाकूर यांचा दावा, नवनीत राणांचाही घेतला समाचार

Yashomati Thakur : तिवसा मतदारसंघात (Tivsa Constituency) कॉंग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकू (Yashomati Thakur) आणि भाजपचे उमेदवार राजेश वानखडे (Rajesh Wankhade) यांच्यात लढत होणार आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं. आता यशोमती ठाकूर यांनी भाजप उमेदवार वानखडे यांच्यावर निशाणा साधला. माझ्या विरोधात भापजने दिलेला उमेदवार हा कॉन्ट्रॅक्टर आहे, असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला.

शिवाजीराव कर्डिलेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी गर्दीच गर्दी, पंकजा मुंडेंनी सभा गाजवली 

यशोमती ठाकूर यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राजेश वानखडे यांच्यावर टीका केली. माझ्या विरोधातले उमेदवार हे कॉन्ट्रक्टर आहेत. मी मोझरीत जन्मले, अमरावतीत लहानाचे मोठे झाले. पण मी माझ्या ऑफीसची जागाही विकत घेऊ शकले नाही. मात्र, समोरच्या उमेदवाराने आल्या-आल्याच भली मोठी बिल्डींग बांधली… आज माझ्याकडे विरोधकांना जे काही दिसतं, ते माझं नाही. तर ते परिवारांकडून मला मिळालं. खासदारकी लढवता असतांना आम्हाला एक एकरी जमीनही विकायचं काम पडलं होतं, असं यशोतमी ठाकूर म्हणाल्या.

अनिल बोंडेंची खासदारकी म्हणजे दंगलीचं गिफ्ट…; यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल 

लाडकी बहीणी मतांसाठीच आहेत का?
राज्यात घडत असलेल्या महिला हिंसाचावरून यशोमती ठाकूर यांनी भापजवर जोरदार निशाणा साधाला. त्या म्हणाल्या, महिलांचा आदर सत्ताधाऱ्याना करणं जमत नाही. भाजपवाल्यांना तर नाहीच नाही. इथले राज्यसभा खासदार अनिल बोंडे हे कायम माझ्याबद्दल वाईट बोलत असतात. त्यांना मुली -बाळी नाहीत का, ते असं कसं एका महिलेविषयी बोलतात? काल परवा जयश्री थोरांताबद्दल भापजच्या एका नेत्याने आक्षेपार्ह विधान केलं. त्या विधानाचा निषेधच आहे. भाजप एकीकडे लाडकी बहीण म्हणतयं, दुसरीकडे महिलांबद्दल वाईट साईट बोलल्या जातं, महिलांना अत्याचार होतोय, मग भाजपसाठी लाडक्या बहीणी केवळ मतांसाठीच आहेत का, असा खरमरीत सवालही यशोमती ठाकूर यांनी केला.

नवनीत राणांच्या राजकारणाचा बेस विचार नाही, तर पैसा..
नवनीत राणा यांच्याविषयी विचारलं असता यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आम्ही जे राजकारण करत आहोत, ते केवळ निवडणुकीसाठी करत नाही, तर समतेचा पुरस्कार करणारी कॉंग्रेसची विचारधारा बळकट राहिले पाहिजे, यासाठी करतो. माजी खासदार 2019 मध्ये आमच्याच मतांमुळं निवडणूक आल्या होत्या. आता त्यांनी आपला ट्रॅक बदलला. नवनीत राणांच्या राजकारणाचा बेस विचार नाही, तर पैसा आहे, अशा शब्दात त्यांना नवनीत राणांवर हल्लाबोल केला.

निवडणुकीत किती लीड घेणार?
निवडणुकीत किती लीड घेणार? असा सवाल केला असता यशोमती ठाकूर म्हणाल्या की, कोण किती लीड घेणार, हा अंदाज कोणीही काढू शकत नाही. मोदींनी चारशे पारचा नारा दिला होता. मात्र, तसं झालं नाही. मी इकचचं सांगेल, मतदारसंघात मला चांगला प्रतिसाद आहे. निवडणूकीचं मला टेन्शन वाटत नाही. मात्र, निडणूक गांभीर्याने लढली पाहिजे. मी प्रत्येक निवडणूक गांभार्याने लढते. आम्ही आता लोकांत जात नाही. आम्ही कायम लोकांच्या संपर्कात असतो. पक्षामार्फत आम्ही कायम उपक्रम राबवत असतो. सेवा करणं हा आमचा धर्म आहे. मला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळं मला टेन्शन वाटत नाही. हा ओव्हर कॉन्फिडन्स मुळीच नाही, कॉन्फिडन्ट आहे, असं त्या म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube