Download App

सर्वांगीण विकास साधणार; मांजरीत पदयात्रेतून बापुसाहेब पठारेंचं आश्वासन

वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमदेवार बापुसाहेब पठारे यांची आज मांजरीत रॅली निघाली. यावेळी त्यांनी सर्वांगीण विकास साधण्याचं आश्वासन नागरिकांना दिलंय.

Bapusaheb Pathare News : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचाराचा धडाका सुरु आहे. अशातच पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बापुसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी प्रचारात आघाडी घेतलीयं. पठारे यांनी आज मांजरी गावात भव्य पदयात्रा काढली. यावेळी नागरिकांनी त्यांना भरभरुन प्रतिसाद दिला असून वडगाव शेरीच्या सर्वांगीण विकास साधण्याचं आश्वासन पठारे यांनी नागरिकांना दिलंय.

सरगुन मेहता आणि रवी दुबे यांचा फॅमिली एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म “ड्रीमियाता ड्रामा” लाँच

यावेळी बोलताना पठारे म्हणाले, वडगाव शेरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासात रोजगाराच्या संधी, मूलभूत सोयीसुविधा, शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात प्रगतीचा समावेश असल्याचं पठारे यांनी स्पष्ट केलंय. पठारेंची पदयात्रा मांजरी खुर्द गावठाण, पवार वस्ती, माणिक वस्ती, दत्त मंदिर रस्ता, सृष्टी पार्क, मानकाई नगर, माहेर संस्था रस्ता, साई पार्क परिसर अशा विविध मार्गांवरून निघाली होती. यावेळी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी बापूसाहेब पठारे यांचे नागरिकांनी हार-फुलांनी स्वागत केले.

विधानसभेच्या रणधुमाळीत सुप्रीम कोर्टाचा अजितदादांना 36 तासांचा अल्टिमेटम; वाचा नेमकं काय घडलं?

बापूसाहेब पठारे यांच्या नेतृत्वाखालील या पदयात्रेचा उद्देश म्हणजे मांजरी गाव व वडगावशेरी मतदारसंघात विकासाचे एक नवे पर्व सुरू करणे आहे. “माझं गाव, माझं कर्तव्य” या भावनेने प्रेरित होतं. मांजरीच्या आणि वडगावशेरीतील प्रत्येक नागरिकाला प्रगतीचा भागीदार बनवण्याचे आश्वासन पठारे यांनी दिले. माझा एकच संकल्प आहे मांजरी आणि वडगावशेरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास. माझं गाव, माझं कुटुंब. मी तुम्हाला दिलेल्या आश्वासनांचा मान राखीन असं आश्वासन पठारेंनी मांजरीकरांना दिलंय.

धमक असेल तर, समोरून हल्ला करा; आरएसएसच्या होमग्राउंडवर जाऊन राहुल गांधींचा जोरदार घणाघात

दरम्यान, बापूसाहेब पठारे यांनी नागरिकांचे थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या आहेत. पठारे यांनी गावात स्वच्छता, पाण्याचा योग्य पुरवठा, चांगले रस्ते, महिलांसाठी सुरक्षा, तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच मांजरी व वडगावशेरीच्या विकासाला गती देणे आणि स्थानिकांना एक उत्कृष्ट जीवनमान उपलब्ध करण्याचंही त्यांनी सांगितलंय.

follow us