Download App

निलेश चव्हाण आणखी खोलात! वैष्णवीच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

निलेश चव्हाण सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. यातच निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण (Vaishnavi Hagawane Case) राज्यभरात चर्चेत आहे. सासरच्या छळाला कंटाळून आणि सततच्या पैशांच्या मागणीला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली होती. या प्रकरणात वैष्णवीचा पती, सासू, नणंद, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीराला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात निलेश चव्हाण याचंही नाव चर्चेत आहे. हाच निलेश चव्हाण सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. यातच निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. वैष्णवी हगवणेच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैष्णवी यांच्या नऊ महिन्यांच्या मुलाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी या प्रकरणात बाल न्याय कायदा, २०१५ मधील ७५, ८७ ही कलमे वाढवली आहेत. तसेच बाळाला बंदिस्त परिस्थित ठेवल्याप्रकरणी सुद्धा कलम वाढ करण्यात आली आहे. वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर तिचे बाळ निलेश चव्हाण याच्याकडे असल्याचे समोर आले होते. निलेश चव्हाण याच्याकडे असताना बाळाची हेळसांड झाली अशी तक्रार कस्पटे कुटुंबियांनी केली होती. त्यानुसार बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

हगवणे प्रकरणातील चव्हाणचा इतिहासही छळाचाच; वाचा संताप आणणारे कारनामे

निलेश चव्हाणचा इतिहास पत्नीच्या छळाचा..

निलेशचा आणि त्याचा वडिलांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांच्याकडे आर्थिक सधानता आलीय. त्याच्या पत्नीचा सातत्याने छळ होत राहिला. शेवटी कंटाळून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये तिने वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मारहाण अन् व्हिडिओ संदर्भात सर्व माहिती सविस्तर दिली. परंतु त्या काळातील वारजे पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते. कारण त्यांनी निलेशला अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली होती. पुणे सत्र न्यायालयाने त्याचा तो अर्ज फेटाळला. तरी देखील निलेश चव्हाण याने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. यानंतर त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता.

या सर्व घटनेनंतर निलेश चव्हाण विभक्त झाला. त्याचा आणि हगवणे कुटुंबांचा घरोबा होता. तो शशांक हगवणे आणि त्याची बहिण यांचा तो मित्र होता. अनेकदा जेव्हा कस्पटेंनी बोलणी केली, तेव्हा ती निलेश चव्हाणच्याच ऑफिसमध्ये झाली. त्यानंतर वैष्णवीच्या मृत्यूनंतर ते बाळ हगवणे कुटुंबांने निलेश चव्हाणकडे दिले होते. आता याच बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केला म्हणून निलेश चव्हाणवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवीला स्त्रीधन म्हणून दिलेल्या चांदीच्या भांड्यासह हगवणेंकडून एक कार अन् दोन पिस्तूल जप्त

follow us