वैष्णवीला स्त्रीधन म्हणून दिलेल्या चांदीच्या भांड्यासह हगवणेंकडून एक कार अन् दोन पिस्तूल जप्त

One Car and two pistols seized from the Hagavans along with a silver vessel given to Vaishnavi as bride price : बहुचर्चित पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशिल हगवणे (Sushil Hagawane) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान या प्रकरणावर राजकारणासह सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांची एक-एक कारवाई सुरू आहे. त्यात आता हगवणे कुटुंबाकडून पोलिसांनी वैष्णवीला तिच्या माहेरहून देण्यात आलेल्या चांदीच्या भांड्यासह हगवणेंकडून एक कार अन् दोन पिस्तूल जप्त केली आहे.
दिघे साहेब असते तर, वैष्णवीच्या घरी महिलांची विनंती अन् शिंदे म्हणाले…
तर या अगोदर वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नात मुलाला लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदीची ताटे आणि फॉर्च्युनर कार दिली होती. वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या सनीज वर्ल्ड येथे झालेल्या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवारही उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी हुंड्यात देण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीविषयी विचारणा केल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, पोलिसांनी आता ती फॉर्च्युनर कार जप्त केली आहे.
Video : ‘त्या’ महिलांमध्ये धैर्य अन् साहस नव्हत….भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांच वादग्रस्त वक्तव्य
तर या प्रकरणा दरम्यान वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की, लग्नानंतर गौरी गणपतीच्या सणात तिच्या सासूने चांदीच्या गौरी मागितल्या. त्याही आम्ही दिल्या. दीड महिन्यांपूर्वी जावयाने माझ्याकडं दीड लाखांचा मोबाइल मागितला होता. तो देखील मी दिला. वैष्णवी कधीही घरी आली की म्हणायची पप्पा पैसे द्या. साडेसात किलो वजनाची चांदीची ताटं दिली. इतकंच नाही तर 51 तोळे सोनं आणि फॉर्च्यूनर गाडीही जावयाला दिली होती. आधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठी दिली होती. वैष्णवी घरी आली की काहीतरी मागत असायची. दीड दोन महिन्यांनी वैष्णवी घरी आली की मी तिला 50 हजार, एक लाख रुपये देत असायचो. असं देखील त्यांनी सांगितलं.