दिघे साहेब असते तर, वैष्णवीच्या घरी महिलांची विनंती अन् शिंदे म्हणाले…

Vaishnavi Hagawane Death Case DCM Eknath Shinde Meet to Vaishnavis Parents : बहुचर्चित पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशिल हगवणे (Sushil Hagawane) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान या प्रकरणावर राजकारणासह सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. वैष्णवीच्या माहेरी म्हणजे कस्पटे कुटुंबाची नेत्यांकडून भेट घेतली जात आहे. त्यात आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कस्पटे कुटुंबाला वैष्णवी हगवणेला न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला आहे.
Video : ‘त्या’ महिलांमध्ये धैर्य अन् साहस नव्हत….भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांच वादग्रस्त वक्तव्य
ही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आहे. कस्पटेंच्या मुलीला मारहाण होत होती. पैशांची मागणी केली जात होती. सून म्हणजे आपल्या मुलीप्रमाणे असते प्रत्येकाला वाटतं आपली मुलगी ज्या घरात जाईल तिकडे तीला मुली प्रमाणे वागवलं पाहिजे. जसं आपण लाडकी बहीण लाडकी मुलगी असं म्हणतो. तसं लाडकी सून अशी मानसिकता झाली पाहिजे अशी परिस्थिती या घटनेने समोर आणली आहे. वैष्णवीला मारहाण झाल्याचे फोटो मी पाहिले तिच्या आई-वडिलांची नातेवाईकांची मानसिकता पूर्ण खालावलेली आहे.
आता राहुरी ते शनिशिंगणापूर रेल्वे धावणार ! नव्या रेल्वे मार्गाला मान्यता, निधीही मंजूर
महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगत राज्य आहे आणि अशा राज्यात ही घटना घडन ही दुर्दैवी तर आहेच पण विश्वास देखील ठेऊ शकत नाही. अशी अमानवीय देखील आहे. मला सगळ्या बाबी त्यांनी सांगितल्या. त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या त्यांना असं वाटतं की, आमची मुलगी नऊ महिन्याचं बाळ समोर असताना अशी आत्महत्या करू शकत नाही.
लालू यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांनी दिली मोठी कबुली; ‘या’ तरुणीच्या १२ वर्षापासून प्रेमात
पोलीस तपास करत आहेत गुन्हा दाखल झाला आहे एसआयटी देखील नेमली आहे. या घटनेत दोषी असतील जे या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यामध्ये कोणी कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न किंवा मदत करण्याचा देखील करू नये. कस्पटे कुटुंबाची मुलगी म्हणजे आमच्या घरातली मुलगी म्हणूनच या प्रकरणाकडे आम्ही पाहत आहोत. यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा; विदर्भ अन् मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
तर महिला आयोगावर बोलताना शिंदे म्हणाले की, या घटनेमध्ये कोणीही राजकारण आणता कामा नये. या घटनेला राजकीय दृष्टिकोनातून पाहूच नये. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासोबतच अशा पद्धतीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशा कारवाईची देखील गरज आहे.त्यामुळे शासनाचा फोकस असेल की दोशींवर कठोर कारवाई करणे बाकी राजकारण करायला अनेक संधी असतात. त्यामुळे या ठिकाणी कोणी राजकारण करू नये अशी माझी भावना आहे.
मंत्रिपद मिळून चार दिवस होत नाही तोच भुजबळांची राजीनाम्याची भाषा; थेट घेतलं मुंडेचं नाव
याबाबतीत मुख्यमंत्री स्वतः यावर लक्ष ठेवून आहेत, कस्पटे परिवाराला जे जे वाटतंय त्या बाजूने तपास केला जाईल. उच्चस्तरीय चौकशी या प्रकरणात होत आहे. यामध्ये कुठेही त्रुटी राहणार नाही याची काळजी सरकार घेईल. यामध्ये जो दोष असेल किंवा आरोपीला जो कोणी मदत करत असेल कितीही मोठा अधिकारी असेल किंवा कोणताही राजकीय नेता असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल तरीही त्याची चौकशी होणार ही घटनाच अशी आहे की एका परिवारातील एक मुलगी गेली आहे त्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच येत नाही.
कस्पटे कुटुंबीय महिला आणि एकनाथ शिंदे यांचा संवाद
कुटुंबीय महिला : साहेब त्यांना अजिबात सोडू नका
एकनाथ शिंदे : बिलकुल नाही सोडणार
कुटुंबीय महिला : त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, त्या नणंदेला तर सोडूच नका. आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी आहोत. ती तुमची भाची होती तिला न्याय मिळवून द्या.
कुटुंबीय महिला : दिघे साहेब असते तर त्यांना या नराधमाला काय शिक्षा दिली असती? आज आम्ही तुमच्यात त्यांनाच बघतोय आणि तुम्ही हे खरचं करून दाखवा
एकनाथ शिंदे : नक्कीच असं म्हणत शिंदे यांनी वैष्णवी हगवणेला न्याय देण्याचा शब्द दिला आहे