Amit Thackeray on Vasant More : वसंत मोरेंनी (Vasant More) मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) पुण्यातून लोकसभेची उमेदवारी दिली. दरम्यान, वसंत मोरेंच्या निर्णयाविषयी अमित ठाकरेंना (Amit Thackeray) विचारले असता त्यांनी वसंत मोरेंवर खोचक टीका केली.
पक्षात फुट, आवडता नेता अन् सध्याचं राजकारण; मकरंद अनासपुरेंकडून चिरफाड
वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचे आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत, असा खोचक टोला अमित ठाकरेंनी लगावला.
अमित ठाकरे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना वसंत मोरेंविषयी विचारले असता ते म्हणाले की, वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचे आहे. ते सोशल मीडियाचे आहारी गेले आहेत. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे, असं अमित ठाकरे म्हणाले.
वसंत मोरे हे वंचितूकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळं पुणे लोकसभेसाठी तिरंगी लढत होणार आहे.
Firing Case: ‘मार देंगे तब पता चलेगा…’, गोळीबार प्रकरणानंतर सलीम खान यांची प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानं त्यांच्यावर विरोधकांकडू टीका होत आहे. यावरही अमित ठाकरेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. मोदी सरकारला जवळपास 300 जागा मिळतील. राज साहेबांनी बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय कार्यकर्त्यांचा विचार करूनच घेतला असणार, असं त्यांनी सांगितलं.
मुंबईत मविआला एकही जागा मिळणार नाही….
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात प्रचार करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही अमित ठाकरे म्हणाले. तसंच मुंबईत उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला एकही जागा मिळणार नाही. वातावरण त्यांच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले.