पुणे : मंत्रिमंडळातून डावलले गेल्याने छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) कमालीचे नाराज झाले असून, ”जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना” असे सूक विधान छगन भुजबळांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंत आज (दि.23) भुजबळांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतली. त्यानंतर त्यांनी भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत सविस्तर भाष्य केले. फडणवीसांनी आपल्याकडून 8 ते 10 दिवसांचा वेळ मागितला असून, त्यानंतर पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग शोधून काढू असे आश्वासन दिल्याचे सांगितले. मात्र, भुजबळ आणि फडणवीस भेटीवर अजितदादांना (Ajit Pawar) विचारले असता दादांचा सूर काहीसा वेगळा दिसून आला. त्यामुळे अजितदादांच्या मनात नेमकं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Ajit Pawar Reaction On Fadnavis Bhujbal Meeting)
“..म्हणून एक-एक खातं देण्याची वेळ फडणवीसांवर आली; अजित दादांचा खुलासा
फडणवीसांकडून मार्ग काढण्याचं आश्वासन – भुजबळ
मी आणि समीर भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली. अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यांनी सांगितलं. आपण मान्य केलं पाहिजे की महायुतीला जो विजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळं लाभलं. त्यांचा मोठा वाटा आहे असल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितल्याचे भुजबळांनी सांगितले. ओबीसींनी महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आभार मानले पाहिजे. तसेच त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी मला असून, त्यांचे नुकसानही होऊ देणार नाही असा शब्ददेखील फडणवीसांनी दिल्याचे भुजबळांनी सांगितले. आठ दहा दिवस मला द्या नंतर पुन्हा भेटू आणि निश्चित चांगला मार्ग शोधून काढू असे फडणवीसांनी आश्वासन दिल्याचेही भुजबळ म्हणाले.
भाजप प्रवेशावर सस्पेंन्स कायम?
मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर नाराज भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात असून, भुजबळ भाजपात प्रवेश करून नव्या राजकीय इनिंगला सुरूवात करण्याची चर्चा आहे. फडणवीसांच्या भेटीनंतर याबाबत भुजबळांना थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळांनी थेट उत्तर देणं टाळलं. ते म्हणाले की, मी जास्त काही बोलणार नाही. याआधीच मला जे काही बोलायचं होतं ते मी बोललो आहे. भुजबळांच्या या उत्तरानंतर भुजबळ खरचं भाजपात प्रवेश करून नव्या राजकीय इनिंगला सुरूवात करणार का? याचा सस्पेंन्स कायम राहिला आहे.
दादांना टोला, शरद पवारांचं कौतुक; राजीनाम्याचा उल्लेख करत भुजबळ म्हणाले, मी कशाला..
नाराज भुजबळांबाबत दादांचा सूर वेगळाचं
छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घडत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी छगन भुजबळांच्या नाराजीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी नुकतंच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ते लवकरच दिल्लीला जाणार असल्याची चर्चाही रंगली आहे, ते नाराज आहेत, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी आमचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्ही तो प्रश्न पक्षातंर्गत सोडवू, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे नाराज भुजबळांबाबत दादांच्या मनात नेमकं काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे.