दादांना टोला, शरद पवारांचं कौतुक; राजीनाम्याचा उल्लेख करत भुजबळ म्हणाले, मी कशाला..
Chhgan Bhujbal replies Ajit Pawar : मंत्रिमंडळातून डावलले गेल्याने छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. मंत्रिपद कुणामुळे मिळालं नाही याचा थेट खुलासा त्यांनी केला नसला तरी त्यांचा रोख राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आहे हे आता लपून राहिलेलं नाही. त्यातच आता अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील दुरावा वाढतच चालला आहे. एकमेकांना तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं जात आहे. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांना छगन भुजबळांनी जशास तसं उत्तर दिलं. दरम्यान, या घडामोडी घडत असतानाच छगन भुजबळांनी आज सागर बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले होते अजित पवार?
मंत्रिमंडळासाठी ज्यावेळी आपण नावं दिली त्यावेळी काही मान्यवरांना आपण थोडं थांबायला सांगितलं. त्यात काहींनी रोष व्यक्त केला. कधी नवीन लोकांना संधी द्यावी लागते. जुन्यांना इथं संधी न देता केंद्रात कशी देता येईल याबद्दल आपण विचार केला आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर छगन भुजबळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
शिंदेंची खेळी यशस्वी? अजितदादांकडं तिजोरीच्या चाव्या पण, खर्च शिंदेच करणार
काय म्हणाले छगन भुजबळ?
लोकसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो. पण त्यांच्याकडून माझी राज्यात गरज आहे असे सांगून मला थांबवण्यात आलं. मग आता ताबडतोब माझी गरज कमी झाली का? कशामुळे मग लढायला सांगायचंच नाही ना. यानंतर मला म्हणतात की राज्यसभेवर जा, याचा दुसरा अर्थ असा की मी विधानसभेचा राजीनामा द्यायचा. पण मी कशाला राजीनामा देऊ? असा सवाल भुजबळांनी केला.
भुजबळांकडू शरद पवारांचं कौतुक
तुमच्या वयावरून आता टीका केली जात आहे असे विचारलं असता भुजबळ म्हणाले, वयाचं काय घेऊन बसलात. पवार साहेबांचं (Sharad Pawar) इतकं वय असताना त्यांनी आमच्यापेक्षा जास्त खासदार निवडून आणले. आता परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडल्या तेथेही तुमच्याआधी (अजित पवार) पवार साहेब तेथे पोहोचले होते. आता खरंतर तरुणपणाची व्याख्या ठरवली पाहिजे. किती वर्षांपर्यंत तरुण म्हणायचं हे ठरवायला हवं. काहीतरी मर्यादा टाका ना. तरुणांना जरुर संधी द्या. पण ही संधी देतानाही काही ज्येष्ठ मंडळी ठेवावीच लागतात असे छगन भुजबळ म्हणाले.
Maharashtra : मला वाटते, भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे, मंत्रिपद मिळताच कोकाटेंचा भुजबळांना टोला