Sharad Pawar-Chhagan Bhujbal : शरद पवार- छगन भुजबळ यांच्या भेटीचे राजकीय अर्थ? वाचा सविस्तर….

Sharad Pawar-Chhagan Bhujbal : शरद पवार- छगन भुजबळ यांच्या भेटीचे राजकीय अर्थ? वाचा सविस्तर….

Sharad Pawar Chhagan Bhujbal Meeting: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Maharashtra Politics) अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट का घेतली असावी याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आणखी स्पष्ट झाली नाही.

अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिसरी आघाडी करण्याच्या तयारीमध्ये आहेत. वंचित किंवा इतर अनेक घटकांना ते सोबत घेणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचे समजत आहे. यामुळे भुजबळ आता थेट शरद पवारांच्या भेटीला आल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिकमधून निवडणूक लढवण्याची इच्छा?

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक शहरातून तिकीट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. याकरिता त्यांनी अनेक हालचाली सुरु केल्या आहेत. छगन भुजबळ यांच्या आग्रहामुळे हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित करण्यास देखील उशीर झाला होता. त्यानंतर राज्यसभेचे तिकीट देखील छगन भुजबळ यांना नाकारण्यात आले होते.

राज्यातील मराठा-ओबीसी परिस्थितीवर झाली चर्चा; छगन भुजबळांना शरद पवारांनी काय दिलं आश्वास?

मराठा-ओबीसी आरक्षण?

यामुळेच छगन भुजबळ महायुती सरकार नाराज असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात होत आहे. तसेच मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावरुन भुजबळ महायुती सरकारवर नाराज असल्याची चर्चा अनेकदा रंगली आहे. शिवाय दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाविषयी छगन हे पवारांसोबत चर्चेसाठी गेल्याचा अंदाज बांधला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube