Download App

स्वारगेट अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, रहाटकरांचे पोलीस महासंचालकांना पत्र, ‘येत्या 3 दिवसात…’

पुण्यात घडलेली घटना खूपच धक्कादायक आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने सुमोटो याचिका दाखल केली आहे. - विजय रहाटकर

  • Written By: Last Updated:

Vijaya Rahatkar : स्वारगेट स्थानकामधील एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatreya Gade) हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेनतंर महाराष्ट्रातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आता राष्ट्रीय महिला आयोगाने (National Commission for Women) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

फुले शाहू आंबेडकरी जनता मटण, दारू आणि पैशाने विकली; प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले? 

केस फास्ट ट्रॅकवर चालवा
नुकताच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, पुण्यात घडलेली घटना खूपच धक्कादायक आहे. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने सुमोटो याचिका दाखल केली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांनाही पत्र पाठवलं आहे. पीडित महिलेची सुरक्षितता आणि तिचे मानसिक आरोग्य तपासण्यासाठी सांगितलं आहे. आरोपीला तात्काळ अटक करून ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच येत्या तीन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल द्यावा, अशीही आपण पोलिसांनी दिल्याचं रहाटकरांनी नमूद केलं.

मराठा बटालियनच्या शौर्यगाथेवर भाष्य करणारा ‘22 मराठा बटालियन – गोष्ट गनिमी काव्याची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! 

आधी सुरक्षा ऑडिट करा…
पुढं त्या म्हणाल्या की, याशिवाय आणखी काही दुसऱ्या घटना घडल्या आहेत का? हे पाहणं देखील आयोगाला महत्वाचं वाटत आहे. संपूर्ण विषयात राष्ट्रीय महिला आयोग काम करेल. पुढील काळात या सगळ्याची माहिती समोर येईलच. सगळ्यात आधी सुरक्षा ऑडिट असणं महत्वाचं आहे. महिला सुरक्षेबाबत सर्व राज्य सरकारांना निर्देश देणं गरजेचं आहे. कॅमेराबाबत काय माहिती आहे, ही तिथून मागवू. पुणे शहर उत्तम आहे. एका घटनेमुळे पूर्ण शहराकडे बोट दाखवणे योग्य होणार नाही, असेही रहाटकर म्हणाल्या.

पुण्यात काही घटना घडल्या हे खरं आहे. पण यामुळे शहराला बदनाम करणं योग्य नाही. पोलीस तपास करत आहेत. पोलिसांना काम करायला आपण वेळ दिला पाहिजे. पोलिसांनी उत्तम तपास करायला हवा, ते तसा करतीलही. आतापर्यंत २३ सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. या सगळ्या घटनेकडे राष्ट्रीय महिला आयोग लक्ष ठेवून आहे. पोलिसांच्या रिपोर्टची आम्ही वाट पाहत आहोत. त्यानंतर पुढील गोष्टी ठरवता येणार आहेत, असंही रहाटकर यांनी नमुद केलं.

follow us